खाण मंत्रालय
एकूण खनिज उत्पादनात मार्च 2023 मध्ये 6.8% वाढ
महत्त्वाच्या खनिज उत्पादनात सकारात्मक वाढ
Posted On:
18 MAY 2023 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2023
खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक मार्च, 2023 (आधार: 2011-12=100) महिन्यासाठी 154.2 इतका आहे. मार्च 2022 मधील पातळीच्या तुलनेत तो 6.8% जास्त आहे. भारतीय खाण विभागाच्या (इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, IBM) तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एप्रिल-मार्च, 2022-23 या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकत्रित वाढ 5.8 टक्के आहे.
महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी मार्च 2023 मध्ये होती: कोळसा 1078 लाख टन, लिग्नाइट 46 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) 2890 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (कच्चे) 25 लाख टन, बॉक्साईट 2115 हजार टन, क्रोमाईट 555 हजार टन, तांबे (सांद्र ) 12 हजार टन, सोने 161 किलो, लोह खनिज 281 लाख टन, शिसे (सांद्र) 42 हजार टन, मॅंगनीज(अशुद्ध) 1 हजार टन, जस्त (सांद्र ) 181 हजार टन, चुनखडी 402 लाख टन, फॉस्फोराईट 220 हजार टन, मॅग्नेसाइट 11 हजार टन आणि हिरे 3 कॅरेट.
मार्च 2022 च्या तुलनेत मार्च, 2023 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमधे यांचा समावेश होतो: (सांद्र )तांबे (41.9%), क्रोमाईट (34%), फॉस्फोराईट (32.8%), मॅंगनीज (13.6%), कोळसा (12.5%), चुनखडी (7.6%) %), (सांद्र ) शिसे (6.3%), लोह खनिज (4.7%), बॉक्साइट (3.6%), आणि नैसर्गिक वायू (U) (2.7%).
* * *
S.Kakade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925297)
Visitor Counter : 247