पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उर्जा चतुष्कोणात जैव इंधनांची भूमिका खूप मोठी आहे : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय सचिव


जैवइंधनांची संपूर्ण क्षमता वापरण्यासाठी जी-20 सदस्य राष्ट्रे एकत्रित येऊ शकतात

Posted On: 18 MAY 2023 11:46AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 मे 2023


केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय सचिव पंकज जैन यांनी जैवइंधनांची भूमिका आणि अधिक स्वच्छ तसेच हरित भविष्यासाठी जैव इंधनांची  संपूर्ण क्षमता वापरण्यासाठी जी-20 सदस्य राष्ट्रांनी एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबई येथे 15 मे 2023 रोजी आयोजित उर्जा संक्रमण  कृतिगटाच्या तिसऱ्या बैठकीच्या अनुषंगाने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आयोजित केलेल्या जागतिक जैवइंधन आघाडी चर्चासत्रात ते बोलत होते.
 
जैन यावेळी बोलताना जैवइंधनांच्या आतापर्यंत न वापरल्या गेलेल्या अव्यक्त क्षमतेवर आणि स्वच्छ उर्जासंक्रमण ,विस्तृत पद्धतींनी वापर, तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता आणि अर्थपुरवठ्याच्या दृष्टीकोनातून त्याचे वाढते महत्त्व यांवर  आपल्या  मांडणीत अधिक भर दिला.

 
आर्थिक समृद्धी, उर्जा सुरक्षा, पोहोच आणि परवडणारे दर यांना चालना देण्यात जैवइंधनांचे महत्त्व तसेच या इंधनांचे शाश्वत आणि निःकार्बनीकरणाला पाठबळ देणारे स्वरूप यांविषयावर त्यांनी विस्तृत विवेचन केले. “तंत्रज्ञानातील आगेकूच जैवइंधनांच्या उत्पादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कच्च्या मालाचे विविध (म्हणजेच ऊस,मका,शेतीतील टाकाऊ कचरा, बांबू, इत्यादीसारखे)पर्याय उपलब्ध करून देत आहे आणि जी-20 सदस्य देशांतील वाढीव सहकार्य जागतिक पातळीवरील जैवइंधन बाजाराचा आणखी विकास करण्यासाठी तसेच जीवइंधनांची संपूर्ण क्षमता जाणून घेण्यासाठी मदत करेल,” ते पुढे म्हणाले.
या अत्यंत महत्त्वाच्या चर्चासत्राला अनेक प्रमुख तेल आणि वायू कंपन्यांचे प्रमुख आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. आयईए, टोटल एनर्जीज, शेल,लांझाटेक, एसएचव्ही एनर्जी फ्युचुरिया यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय उर्जा संघटनांतील प्रमुख प्रतिनिधींनी या चर्चासत्रात सुयोग्य तंत्रज्ञान, वापराचे प्रकार, भागीदारी तसेच व्यापारी क्षमता यांच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली. या मंचाने जीवइंधनांच्या(विमानांमध्ये वापरले जाणारे एसएएफ अल्कोहोल, बायोडीझेल,इथेनॉल उत्पादनासोबत कॉम्प्रेस्ड बायोगॅस, नवीकरणीय डीएमई, इत्यादी)   वाढत्या समर्पकतेला  व्यापक प्रमाणात पोचपावती दिली.
तेल आणि वायू उद्योग क्षेत्र, आयईए यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना, बायोफ्युचर मंच, जी-20 सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी, सीआयआय आणि असोचेमसारख्या उद्योग संघटना, प्रमुख वाहन उत्पादन, निर्माते आणि महत्त्वाचे तंत्रज्ञान पुरवठादार आणि त्यांच्या संघटना यांनी या चर्चासत्रात मनःपूर्वक सहभागी होऊन प्रोत्साहन दिले.

****


 Jaidevi PS/Sanjana/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1925144) Visitor Counter : 247
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu