मंत्रिमंडळ

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि द चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ मालदीव् यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 17 MAY 2023 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि द  चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ मालदीवज  (सीए मालदीव) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास मंजुरी देण्यात आली.

तपशील:

आयसीएआय आणि सीए मालदीवचे उद्दीष्ट लेखा ज्ञान, व्यावसायिक आणि बौद्धिक विकासाच्या प्रगतीसाठी परस्पर सहकार्य स्थापित करणे, त्यांच्या संबंधित सदस्यांचे हित संबंध वाढविणे आणि मालदीव आणि भारतातील लेखा व्यवसायाच्या विकासात सकारात्मक योगदान देणे आहे.

परिणाम :

मालदीवच्या सनदी लेखापालांना मदत करण्याबरोबरच या सामंजस्य करारामुळे आयसीएआय सदस्यांना भविष्यात मालदीवमध्ये व्यावसायिक संधी मिळण्याच्या शक्यतांना अतिरिक्त चालना मिळेल. या सामंजस्य करारामुळे अकाउंटन्सी व्यवसायातील सेवांची निर्यात प्रदान करून आयसीएआय मालदीवबरोबरची भागीदारी मजबूत करण्यास मदत करेल, आयसीएआय सदस्य देशभरातील विविध संघटनांमध्ये मध्यम ते उच्च स्तरीय पदांवर आहेत आणि एखाद्या देशाच्या संबंधित संघटनांच्या निर्ण घेण्याच्या धोरणांवर प्रभाव टाकू शकतात.

फायदे :

या सामंजस्य करारामुळे आयसीएआय सदस्यांना त्यांचे व्यावसायिक क्षितिज विस्तारण्याची संधी मिळेल आणि आयसीएआयला स्थानिक नागरिकांच्या क्षमता वाढीस मदत करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या सामंजस्य करारामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील कार्यरत  संबंध मजबूत होण्यास चालना मिळेल. या करारामुळे दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांची गतिशीलता वाढेल आणि जागतिक स्तरावरील व्यवसायाला नवा आयाम मिळेल.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे:

विचारांची देवाणघेवाण, व्यावसायिक लेखा प्रशिक्षण संदर्भातील माहिती, व्यावसायिक मुल्ये, तांत्रिक संशोधन, सनदी लेखापालांचा व्यावसायिक विकास, या माध्यमातून लेखा व्यवसायाच्या बाबतीत आयसीएआय आणि सीए मालदीव यांच्यातील सहकार्य मजबूत करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दीष्ट आहे. एकमेकांचे संकेतस्थळ, चर्चासत्रे, परिषदा, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण कार्यक्रम आणि दोन्ही संस्थांसाठी परस्पर फायदेशीर इतर संयुक्त उपक्रमांद्वारे परस्पर सहकार्याला चालना देण्याचा हेतू आहे. या सामंजस्य करारामुळे जगात या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत आणि मालदीवमधील लेखा व्यवसायाच्या विकासाविषयी अद्ययावत माहिती मिळेल. याव्यतिरिक्त, सीए मालदीव 135 देशांमध्ये 180 पेक्षा जास्त सदस्यांसह इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (आयएफएसी) या जागतिक व्हॉइस ऑफ अकाऊंटन्सी व्यवसायाचे सदस्य बनू इच्छित आहे. सीए मालदीवला आयएफएसीचे सदस्य बनविण्यासाठी आयसीएआय, सीए मालदीवला तांत्रिक सहकार्य करेल.

पार्श्वभूमी:

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ही भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्सच्या व्यवसायाच्या नियमनासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स क्ट , 1949 अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. आयसीएआयने शिक्षण, व्यावसायिक विकास, उच्च लेखांकन, लेखापरीक्षण आणि नैतिक मानकांच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, जे जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आहे.

S.Tupe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 (Release ID: 1924853) Visitor Counter : 144