संरक्षण मंत्रालय

‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’: 814 कोटी रुपये आयात मूल्यांच्या पर्यायी वस्तू 164 स्वदेशी वस्तू/उपकरणे यांचे नियोजित वेळेत भारतातच उत्पादन करण्यात ‘ डीपीएसयू’ ला यश

Posted On: 16 MAY 2023 3:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2023

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला आणखी बळ देत, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षण उत्पादन विभागाने अधिसूचित केलेल्या भारतीय यादीतील 164 वस्तू, ज्या एरवी निर्यात करण्यासाठी भारताला 814 कोटी रुपयांचा खर्च आला असता,त्या सगळ्या वस्तू आता भारतातच,तयार होणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (DPSUs) ने ह्या सगळ्या वस्तू भारतात तयार केल्या आहेत. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागीदार, ज्यात एमएसएमईचा ही समावेश आहे, त्यांच्या मदतीने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. डीपीएसयूच्या यादीतील या स्वदेशी वस्तू श्रीजन पोर्टल वर उपलब्ध आहेत. (https://srijandefence.gov.in/NotificationDt12052023.pdf).

डीडीपी ने चार पीआयएल मध्ये 4,666 वस्तूंची अधिसूचना जारी केली आहे. यात, लाईन रिप्लेसमेंट युनिट्स (LRUs/ उप प्रणाली/ सुटे भाग आणि डीपीएसयु चे घटक, यांचा समावेश आहे. यापूर्वी, 1,756 कोटी रुपयांच्या आयात मूल्य असलेल्या 2,572 वस्तूंचे यशस्वी स्वदेशीकरण झाले आहे. आता, या 164 अतिरिक्त वस्तूंच्या अधिसूचनेसह, डीडीपीच्या या जनहित याचिकांमधून डिसेंबर 2022 पर्यंत स्वदेशी वस्तूंची एकूण संख्या 2,736 इतकी आहे, ज्याचे आयात मूल्य 2,570 कोटी रुपये आहे. या स्वदेशी वस्तू आता फक्त भारतीय उद्योगांकडूनच खरेदी केल्या जातील.

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924484) Visitor Counter : 141