केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

डॉ.मनोज सोनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली

Posted On: 16 MAY 2023 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2023

डॉ.मनोज सोनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य स्मिता नागराज यांनी त्यांना शपथ दिली.

डॉ.मनोज सोनी यांनी दिनांक 28 जून 2017 रोजी आयोगाचे सदस्य म्हणून त्यांच्या कार्याला प्रारंभ केला आणि नंतर 05 एप्रिल 2022 पासून भारतीय राज्यघटनेच्या कलम 316 (अ) अंतर्गत आयोगाच्या अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये नेमणूक होण्याआधीच्या काळात, डॉ. सोनी यांनी आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांचा अभ्यास या विषयात विशेष प्राविण्य मिळवले तसेच सरदार वल्लभभाई विद्यापीठातून शीतयुध्दपश्चात काळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील स्थित्यंतर आणि भारत- अमेरिका संबंध या विषयात डॉक्टरेट मिळवली. बडोदा येथील एम.एस महाविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून एकदा आणि गुजरातच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून दोनदा अशी एकूण तीन वेळा उप-कुलगुरूपदाची जबाबदारी निभावली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील ते वयाने आतापर्यतचे सर्वात लहान उपकुलगुरू ठरले आहेत. डॉ.सोनी यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले असून त्यांच्याद्वारे लिखित अनेकानेक उत्तम साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत.

 

 

S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924482) Visitor Counter : 626