वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

एप्रिल 2023 मध्ये भारताची एकूण निर्यात 65.02 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाल्याचा अंदाज : 2 टक्के सकारात्मक वाढ

Posted On: 15 MAY 2023 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मे 2023


इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांदूळ, औषधे आणि फार्मास्युटिकल्स, तेलबिया, सिरॅमिक उत्पादने आणि काचेच्या वस्तू आणि मसाले यांनी एप्रिल 2023 मध्ये निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली.

  • एप्रिल 2023 मध्ये भारताची एकूण निर्यात (व्यापारी आणि सेवा एकत्रित)  65.02 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी असण्याचा अंदाज आहे, जी एप्रिल 2022 च्या तुलनेत 2 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शविते. एप्रिल 2023  मध्ये एकूण आयात    66.40 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी असण्याचा अंदाज असून आयातीमध्ये   एप्रिल 2022 च्या तुलनेत (-) 7.92 टक्क्यांनी नकारात्मक वाढ दर्शवतो.

माल व्यापार

  • एप्रिल 2022 मधील  39.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये मालाची निर्यात  34.66 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी होती.
  • एप्रिल 2023 मध्ये व्यापारी मालाची आयात 49.90 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली, जी एप्रिल 2022 मध्ये  58.06 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती.
  • एप्रिल 2023 मध्ये  खनिज तेल विरहीत, रत्ने  विरहीत    आणि दागिन्यांची निर्यात  25.76 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती, ती एप्रिल 2022 मध्ये 28.37 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती.
  • एप्रिल 2023 मध्ये  बिगर-पेट्रोलियम आणि बिगर रत्ने  आणि दागिने  (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) आयात  31.49 अब्ज अमेरिकी डॉलर्स  झाली, जी एप्रिल 2022 मध्ये 36 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती.

सेवा व्यापार

  • एप्रिल 2023 साठी सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य 30.36  अब्ज अमेरिकी डॉलर्स   आहे, जे एप्रिल 2022 मध्ये 24.05  अब्ज अमेरिकी डॉलर्स   होते.
  • एप्रिल 2023 साठी सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 16.50  अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे जे एप्रिल 2022 मध्ये 14.06  अब्ज अमेरिकी डॉलर्स  होते.
  • एप्रिल 2022 मधील 1.67  अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या   तुलनेत एप्रिल 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात 26.49 टक्क्यांनी वाढून 2.11 अब्ज  अमेरिकी डॉलर्स झाली.
  • एप्रिल 2023 मध्ये कापड, प्लास्टिक आणि लिनोलियम निर्यातीत घट होत राहिली कारण प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदीच्या प्रभावामुळे मागणी कमी झाली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924289) Visitor Counter : 160


Read this release in: Hindi , Tamil , English , Urdu