कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमसीए रजिस्टरमधून कंपन्यांना त्रास-मुक्त फाइलिंग, वेळेत पूर्ण होणारी आणि प्रक्रियाबध्द स्ट्राइक ऑफ सुविधा प्रदान करण्यासाठी सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सेलरेटेड कॉर्पोरेट एक्झिट (सी-पेस) ची स्थापना

Posted On: 13 MAY 2023 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2023

 

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) ने सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सेलरेटेड कॉर्पोरेट एक्झिट (C-PACE) ची स्थापना करून कंपन्यांच्या स्ट्राइक ऑफ प्रक्रियेचे केंद्रीकरण करून एक पाऊल पुढे टाकले आहे. स्ट्राइक ऑफ म्हणजे एखादी कंपनी तात्पुरती बंद करणे किंवा कंपनीचे नाव रजिस्ट्रारकडे असलेल्या कंपन्यांच्या यादीतून काढून टाकणे. C-PACE च्या स्थापनेमुळे रजिस्ट्रीवरील ताण कमी करण्यास मदत होईल तसेच ही यादी नीटनेटकी ठेवण्यात शिवाय संबंधित हितधारकांना अधिक अर्थपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. C-PACE द्वारे संबंधित हितधारकांना त्यांच्या कंपनीची नावे रजिस्टरमधून काढून टाकण्यासाठी, वेळेत पूर्ण होणारी आणि प्रक्रियाबध्द स्ट्राइक ऑफ सुविधेचा देखील लाभ मिळेल. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अलीकडच्या काळात व्यवसाय सुलभीकरण आणि कंपन्यांसाठी बाहेर पडणे सुलभ करण्याच्या उद्देशाने केलेल्या अनेक उपायांचा एक भाग म्हणून C-PACE ची स्थापना करण्यात आली आहे. 

कलम 396 च्या उप-कलम (1) अंतर्गत स्थापन केलेली C-PACE संस्था अर्जांची प्रक्रिया आणि विनियोग करण्याच्या कार्यात्मक अधिकार क्षेत्राचा वापर करण्याच्या उद्देशाने रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) मार्फत कार्यरत राहील.

C-PACE कार्यालयाचे उद्घाटन 1 मे 2023 रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या तपासणी आणि अन्वेषण विभागाचे संचालक आर.के. दालमिया यांच्या हस्ते करण्यात आले होते. भारतीय कार्पोरेट कायदा सेवेतील अधिकारी हरिहरा साहू यांची C-PACE कार्यालयाचे प्रथम निबंधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. C-PACE कार्यालय नवी दिल्ली येथील कॉर्पोरेट व्यवहार महासंचालकांच्या (DGCoA) देखरेखीखाली / प्रशासनाखाली काम करेल. 

 

C-PACE बद्दल विशेष माहिती:

C-PACE ची स्थापना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे (MCA) दिनांक 17 मार्च 2023 रोजी जाहीर अधिसूचना क्रमांक S.O 1269(E) द्वारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (IICA), 7 वा मजला, प्लॉट क्रमांक 6,7,8, सेक्टर 5, IMT मानेसर, जिल्हा गुडगाव (हरियाणा), पिन कोड - 122050 येथे स्थित असलेल्या कार्यालयांतून करण्यात आली.

त्यानंतर अधिसूचना क्रमांक G.S.R. 298(E) दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी, मंत्रालयाने कंपनी (कंपनी नोंदणीतून कंपन्यांची नावे काढून टाकणे) नियम, 2023 मध्ये सुधारणा केली. ही सुधारणा 1 मे 2023 पासून लागू करण्यात आली आहे.

 

* * *

S.Thakur/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923888) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu