संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या जहाजांनी कंबोडियातील सिहानोकविलेला भेट दिली
सागरी सहकार्य मजबूत करून दोन्ही देशांमधील मैत्रीचे मजबूत बंध अधिक दृढ करतील
आसियान देशांमध्ये भारतीय नौदलाच्या तैनातीचा एक भाग
Posted On:
12 MAY 2023 10:00AM by PIB Mumbai
आसियान देशांमध्ये भारतीय नौदल तैनात केले जात आहे . त्याचा एक भाग म्हणून फ्लॅग ऑफिसर कमांडिंग ईस्टर्न फ्लीटचे रियर ऍडमिरल गुरचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाची जहाजे दिल्ली आणि सातपुडा 11 ते 14 मे 23 या कालावधीत कंबोडियाच्या सिहानोकविले बंदरात थांबणार आहेत. यातून कंबोडियासोबत भारताचे सौहार्दपूर्ण संबंध दिसून येतात.
या पोर्ट कॉल दरम्यान, दोन्ही नौदलांचे कर्मचारी आंतर-कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक व्यावसायिक संवाद साधतील , जहाजांवरील डेकला भेट देतील तसेच क्रीडा विषयक आदानप्रदान देखील करतील.
आयएनएस दिल्ली ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका आहे तर आयएनएस सातपुडा ही स्वदेशी बनावटीची बहुपयोगी युद्धनौका आहे. ही दोन्ही जहाजे वैविध्यपूर्ण शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्स यांनी सुसज्ज असून विविध हेतूंसाठी वापरात येणारी हेलिकॉप्टर्स वाहून नेऊ शकतात. ही दोन्ही जहाजे भारताच्या प्रगत जहाज संरचना आणि जहाज बांधणी क्षमतेचा पुरावा आहेत.
सागरी सहकार्य मजबूत करून दोन्ही देशांमधील मैत्रीचे मजबूत बंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करणे हा भारतीय नौदलाच्या जहाजांच्या भेटीचा उद्देश आहे.
***
RadhikaA/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923590)
Visitor Counter : 171