अर्थ मंत्रालय

अटल पेन्शन योजने अंतर्गत 5.25 कोटी सदस्यांच्या नोंदणीने योजनेच्या 8 वर्षांची यशस्वी अंमलबजावणी

Posted On: 11 MAY 2023 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

भारत सरकारच्या अटल पेन्शन योजना(एपीवाय) या सामाजिक सुरक्षा क्षेत्रातील अग्रणी योजनेने यशस्वी अंमलबजावणीची 8 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व नागरिकांना, विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धावस्थेत उत्पन्न सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली होती.

या योजनेची अंमलबजावणी देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वसमावेशक पद्धतीने झाली असून या योजनेच्या सदस्य संख्येने 5.25 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एपीवाय योजनेला सुरुवात झाल्यापासून सदस्यसंख्येच्या नोंदणीचा कल सातत्याने वरचा राहिला आहे. नव्या नोंदणीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली. तर 2021-22 या आर्थिक वर्षात 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 25 टक्के वाढ झाली होती. आजतागायत व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता(AUM) 28,434 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि या योजनेमुळे तिच्या प्रारंभापासून 8.92% गुंतवणुकीचा परतावा मिळाला आहे.

समाजातील सर्वाधिक असुरक्षित घटकाला पेन्शन योजनेच्या कक्षेत आणण्याची ही कामगिरी सार्वजनिक आणि खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, पेमेंट बँका, लघु वित्तपुरवठा बँका, टपाल विभाग यांनी केलेले अथक परिश्रम आणि राज्य स्तरीय बँकर्स समितीने दिलेले पाठबळ याशिवाय होऊ शकली नसती.  18-40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला ज्याचे बँकेत बचत खाते असेल आणि जो प्राप्तिकरदाता नसेल अशा कोणालाही हे खाते उघडता येऊ शकते. एपीवाय अंतर्गत खातेदाराला 60 वर्षे वय झाल्यानंतर हयातभर त्याच्या हप्त्याच्या योगदानानुसार रु. 1000 ते 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळेल. खातेदाराने ही योजना सुरू करताना त्याचे जे वय असेल त्यानुसार त्याच्या हप्त्याची रक्कम कमी अधिक होत असते. खातेदाराच्या मृत्युनंतर त्याच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत जमा झालेली पेन्शनची रक्कम त्या व्यक्तीच्या जोडीदाराला आणि खातेदार आणि त्या व्यक्तीचा जोडीदार या दोघांचाही मृत्यु झाल्यावर त्यांच्या वारसाला परत केली जाईल.

भारत सरकारच्या उद्देशानुसार भारताला एक पेन्शनयुक्त समाज बनवण्यासाठी पीएफआरडीए नेहमीच वचनबद्ध आहे.

एपीवाय योजनेअंतर्गत गेल्या 8 वर्षातील सदस्यसंख्येचे बँकनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहेत.(लाखांमध्ये)

Category   of Banks

As on (March 31, 2016)

As on (March 31, 2017)

As on (March 31, 2018)

As on (March 31, 2019)

As on

(March 31, 2020)

 

As on

(March 31, 2021)

 

As on

(March 31, 2022)

Additions During FY 2022-23

As on

(March 31, 2023)

 

As on

(May 09, 2023)

Public Sector Banks

16.581

29.859

64.443

105.35

154.183

209.195

278.487

86.607

365.095

368.77

Regional Rural Banks

4.763

11.152

19.871

31.711

43.301

57.107

75.280

24.267

99.548

100.41

Private Banks

2.531

5.586

9.829

13.297

18.20

23.193

29.210

5.13

34.347

34.54

Small Finance Bank

-

-

-

0.09

0.157

0.351

0.862

0.785

1.648

1.67

Payment Bank

-

-

-

0.481

3.44

8.188

12.880

2.159

15.039

15.12

Co-op Banks

0.22

0.339

0.456

0.543

0.705

0.80

0.928

0.141

1.069

1.10

DOP

0.753

1.899

2.453

2.703

3.02

3.321

3.623

0.215

3.839

3.84

Total

24.84

48.83

97.05

154.18

223.01

302.15

401.27

119.31

520.58

525.45

S.Bedekar/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923514) Visitor Counter : 134