अर्थ मंत्रालय

केन्द्रीय कर अधिकाऱ्यांना एसीईएस -जीएसटी आधारित आवेदनानुसार, जीएसटी परतावे भरण्यासाठी स्वयंचलित परतावे छाननी मोड्यूल सीबीआयसीने केले जारी

Posted On: 11 MAY 2023 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ- सीबीआयसीच्या कामगिरीचा अलीकडेच घेतलेल्या आढाव्यात, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन यांनी, जीएसटी परतावे भरण्यासाठी,स्वयंचलित परतावे छाननी मॉडयूल लागू करण्याचे निर्देश दिले होते.

या सूचना न देणाऱ्या, अनुपालन पडताळणी साधनाची अंमलबजावणी करण्यासाठी, सीबीआयसीने त्यांच्या कर अधिकाऱ्यांना एसीईएस- जीएसटी आधारित आवेदनांसाठी, स्वयंचलित परतावे छाननी मोडयूल लागू करण्यात आले आहे. ह्या मोड्यूलमुळे, अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशासनाच्या अखत्यारीतील करदात्यांच्या जीएसटी परताव्याची छाननी करता येणार आहे. त्यासाठी डेटा विश्लेषण आणि प्रणालीने हेरलेली जोखीम याचा आधार घेतला जाईल.

या मॉडयूल मध्ये, कर परताव्याशी संबंधित, विसंगती, कर अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या जातील. फॉर्म ASMT-10 अंतर्गत लक्षात आलेल्या विसंगती, फॉर्म ASMT-11 मधील करदात्यांच्या उत्तराची पावती आणि स्वीकृतीचा आदेश जारी करण्याच्या स्वरूपात त्यानंतरच्या कारवाईसाठी GSTN कॉमन पोर्टलद्वारे करदात्यांशी संवाद साधण्यासाठी कर अधिकाऱ्यांना माहिती दिली जाईल. फॉर्म ASMT-12 मधील उत्तर किंवा कारणे दाखवा नोटीस जारी करणे किंवा ऑडिट/तपास सुरू करणे, हे ही या मोड्यूल द्वारे  केले जाईल.

या स्वयंचलित परतावे छाननी मॉडयूलची अंमलबजावणी आर्थिक वर्ष 2019-20 च्या जीएसटी परताव्याच्या छाननीसह सुरू झाली असून या उद्देशासाठी आवश्यक डेटा आधीच अधिकाऱ्यांच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923505) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi