इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

माय-जीओव्ही, सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने ‘युवा प्रतिभा – पेंटिंग टॅलेंट हंट’ सुरू करणार

Posted On: 10 MAY 2023 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मे 2023

विविध चित्रकला शैलींमधील नवीन कला प्रतिभा हेरून आणि त्याला ओळख देऊन राष्ट्रीय स्तरावर भारताचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत, माय-जीओव्ही (MyGov), सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने 11 मे 2023 रोजी ‘युवा प्रतिभा- पेंटिंग टॅलेंट हंट (चित्रकला प्रतिभा शोध)’, या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहे.

पेंटिंग टॅलेंट हंट ही स्पर्धा देशभरातील नागरिकांसाठी आपली कलात्मक प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करून, राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून देईल.

जर एखाद्या व्यक्तीला आपण नवीन भारताचे उदयोन्मुख कलाकार, चित्रकार, सूक्ष्म-चित्रकार किंवा व्यक्तिचित्रकार बनावे, असे वाटत असेल, तर त्याला/तिला  'युवा प्रतिभा - पेंटिंग टॅलेंट हंट' मध्ये सहभागी होता येईल, आणि पुढील संकल्पनांवर आपल्यामधील सृजनशीलता आणि कारागिरी प्रदर्शित करता येईल:

  • वारसा आणि संस्कृती
  • शौर्य आणि देशभक्ती
  • सार्वजनिक नायक आणि नेते
  • निसर्ग आणि पर्यावरण

सहभागी कसे होता येईल:

  1. पुढील लिंक वर लॉग-इन करा https://innovateindia.mygov.in/
  2. ही स्पर्धा देशभरातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
  3. सर्व कलाकृती MyGov पोर्टलवर पाठवणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्धतीने दाखल केलेल्या कलाकृती मूल्यमापनासाठी विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  4. सहभागींनी आपले पेंटिंग (कलाकृती) JPG/JPEG/PNG/PDF फॉरमॅटमध्ये दाखल करणे आवश्यक आहे आणि पेंटिंगचा आकार 2 फूट बाय 1.5 फूट (24 x 18) पेक्षा कमी नसावा.
  5. पेंटिंग पुढील माध्यमांमध्ये बनलेले असावे: पाणी, तेल आणि ऍक्रेलिक रंग.
  6. ही स्पर्धा हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल.

स्पर्धेच्या पहिल्या तीन विजेत्यांची नावे नवी दिल्लीमधील अंतीम फेरीत (प्रत्यक्ष) घोषित केली जातील.

स्पर्धेसाठी प्रारंभिक सबमिशन (कलाकृती दाखल करण्याची प्रक्रिया) दीड महिन्याच्या कालावधीसाठी खुले राहील.

पुरस्कार आणि सन्मान:

  • प्रथम विजेता: 1,00,000/- + स्मृतीचिन्ह + प्रमाणपत्र
  • द्वितीय विजेता: 75,000/- + स्मृतीचिन्ह + प्रमाणपत्र
  • तृतीय विजेता: 50,000/- + स्मृतीचिन्ह + प्रमाणपत्र
  • अंतिम फेरीतील त्यापुढील 17 स्पर्धकांना प्रत्येकी ₹10,000/- चे रोख पारितोषिक दिले जाईल.

मार्गदर्शन: पहिल्या तीन विजेत्यांना मेंटॉरशिप स्टायपेंडसह (मार्गदर्शन भत्त्यासह) एक महिन्याच्या कालावधीसाठी मार्गदर्शन केले जाईल.

MyGov नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्यासाठी आमंत्रित करत आहे. अधिक माहितीसाठी येथे भेट द्यावी:

https://innovateindia.mygov.in/painting-challenge/.

 

  S.Patil/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923245) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil