रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2023 मध्ये महिनाभर चाललेल्या विशेष मोहिमेदरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 42 हून अधिक बेकायदेशीर सॉफ्टवेअर केली नष्ट, 955 एजंट, विकासक आणि किरकोळ विक्रेत्यांना अटक


दगडफेकीच्या परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आरपीएफने अनेक मोहिमा राबविल्या

Posted On: 10 MAY 2023 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मे 2023

रेल्वे सुरक्षा वाढवण्याच्या आपल्या ध्येयाला अनुसरून, रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ने एप्रिल 2023 मध्ये दोन गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी महिनाभराची विशेष पॅन इंडिया मोहीम राबवली. रेल्वे ई-तिकीटांच्या काळ्या बाजारात गुंतलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवणे आणि कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे ही पहिली मोहीम होती.  तर दुसऱ्या मोहीमेअंतर्गत गाड्यांवर दगडफेक होऊ शकते ती ठिकाणे (ब्लॅक स्पॉट्स) शोधून, कुठल्या गाड्यांवर दगडफेक केली जाऊ शकते त्या असुरक्षित गाड्या ओळखून संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

अनधिकृत तिकीट बुकिंग एजंट शोधण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी मोहिमेदरम्यान आरपीएफ कर्मचार्‍यांनी रेल्वे स्थानके, आरक्षण काउंटर आणि ऑनलाइन सामग्रीची नियमित तपासणी केली. अनधिकृत एजंटांकडून तिकीट बुक केल्यामुळे काय होऊ शकते त्याबद्दल आरपीएफ जवानांनी जनजागृती केली.  तसेच कायदेशीर मार्गाने तिकीटांचे आरक्षण आणि खरेदी करण्याचे आवाहन केले. आरपीएफने बेकायदेशीर सॉफ्टवेअर्सचे 955 दलाल, विकासक, सुपर सेलर, विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना अटक करून 42 हून अधिक बेकायदेशीर सॉफ्टवेअर्स नष्ट केली.

धावत्या प्रवासी गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये अचानक झालेली वाढ आरपीएफच्या निदर्शनास आली. प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेला या दगडफेकीमुळे गंभीर धोका निर्माण झाला होता. यावर मात करण्यासाठी आरपीएफने स्थानिक अधिकारी आणि ग्राम प्रशासन, जसे की ग्रामपंचायती आणि त्यांचे प्रतिनिधी, शाळा, ट्रॅकवरील वस्ती आणि महाविद्यालये यांच्यासोबत काम करून दगडफेकीच्या परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक मोहिमा आयोजित केल्या. या विषयावर जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये नोटिस आणि पत्रके प्रसिद्ध करण्यात आली आणि जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात आली. याव्यतिरिक्त, आरपीएफने इतर अनेक उपाययोजना केल्या.  ब्लॅक स्पॉट्सवर जवानांना तैनात करण्यात आले. रेल्वेगाडीची देखरेख आणि रेल्वे मालमत्तांमध्ये अवैधरित्या संचार करणार्‍यांच्या विरोधात . रेल्वे कायद्याच्या तरतुदींखाली कारवाई करण्यात आली.   या संदर्भात पोलीस, गुप्तचर संस्था आणि इतर कायद्यांची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांसोबत विशेष समन्वय बैठकाही घेण्यात आल्या. हा गुन्हा केल्याबद्दल 84 जणांना अटक करण्यात आली.

 

 S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923184) Visitor Counter : 155