अवजड उद्योग मंत्रालय

आपण ‘लोकल’ ते ‘ग्लोबल’ उपक्रम यशस्वी केला पाहिजे: डॉ. महेंद्रनाथ पांडे


एवायसीएलची वृद्धीच्या दिशेने आगेकूच, चहाच्या निर्यातीत 431%ची भरीव वाढ

Posted On: 10 MAY 2023 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मे 2023

अँड्र्यू यूल आणि कंपनीने (एवायसीएल)गेल्या वर्षीच्या चहा निर्यातीच्या तुलनेत या वर्षी चहा निर्यातीत 431% ची भरघोस वाढ नोंदवत कंपनीच्या इतिहासातील सर्वोच्च वृद्धी गाठल्याबद्दल कंपनीचे अभिनंदन करत, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे यांनी म्हटले आहे की हे यश म्हणजे चहा उद्योगामध्ये दर्जा तसेच नवोन्मेष यांच्याप्रती एवायसीएलच्या कटिबद्धतेचा पुरावाच आहे.

केंद्रीय मंत्री डॉ.पांडे पुढे म्हणाले की एवायसीएलच्या वृद्धीची आगेकूच हा या क्षेत्रात असलेल्या क्षमतेचा पुरावा आहे.  यातून सतत विकसित होत असलेल्या या उद्योगामध्ये अभिनव संशोधन आणि स्वीकारार्हता यांचे असलेले महत्त्व अधोरेखित होते. ते म्हणाले की  एवायसीएलचे हे यश भारताला जागतिक बाजारात एक महत्त्वाचा देश म्हणून भारताचे स्थान सशक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी देखील सुसंगतच आहे. तसेच कंपनीची ही कामगिरी पंतप्रधानांचे ‘लोकल’ ते ‘ग्लोबल’ उपक्रम यशस्वी करण्याचे स्वप्न साकार करण्यात आपल्याला मदत देखील करत आहे.देशातील उत्पादनांच्या  परदेशी  निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सक्रियतेने विविध योजना राबवून मदत अनुदाने देखील देत आहे असे त्यांनी सांगितले.

एवायसीएल ही कंपनी उच्च दर्जाच्या पारंपरिक आणि सीटीसी चहांचेउत्पादन करते. या कंपनीत उत्पादित होणारे मून ड्रॉप, सिल्व्हर नीडल आणि ऊलाँग हे चहाचे प्रकार विशेष प्रसिद्ध आहेत.युके, संयुक्त अरब अमिरात आणि पोलंड यांसारख्या देशांमध्ये होत असलेल्या चहा निर्यातीने 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीची निर्यात विक्रमी पातळीवर नेण्यात योगदान दिले आहे.

एवायसीएल ही केंद्र सरकारची चहा उद्योगात कार्यरत असलेली सार्वजनिक क्षेत्र कंपनी आहे.वर्ष 1863 मध्ये या कंपनीची स्थापना झाली आणि वर्ष 1979 पासून ही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये रुपांतरित झाली. ही कंपनी चहा, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांचा व्यवसाय करते. आसाम तसेच पश्चिम बंगालमध्ये या कंपनीचे चहाचे  15 मळे आहेत.   एवायसीएल ही कंपनी आता मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपनी असून 31 मार्च 2023 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार, बाजारातील आघाडीच्या 1000 कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश होतो. एवायसीएलमध्ये 14,225 नियमित कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी 48.5% महिला कामगार आहेत. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 91.141कर्मचारी अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय श्रेणीतील आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश कर्मचारी आसाम, दुआर्स आणि दार्जिलिंग येथील चहा मळ्यांमध्ये काम करतात आणि ईशान्य प्रदेशातील दुर्गम भागाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतात.

 

 S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923123) Visitor Counter : 126


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu