संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांची घेतली भेट, संरक्षण उपकरणांच्या सह उत्पादनांसाठी भारतात अधिक जास्त गुंतवणूक करण्याचे इस्रायलच्या कंपन्यांना केले आवाहन


अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासोबत भागीदारी करण्याची इस्रायलने व्यक्त केली इच्छा

Posted On: 09 MAY 2023 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्या नेतृत्वाखालील इस्रायलच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या बैठकीदरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत धोरणाला अनुसरून स्वदेशीकरणाला असलेले भारत सरकारचे प्राधान्य अधोरेखित केले. इस्रायली कंपन्यांकडून दिल्या जात असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आणि भारतामध्ये संरक्षण उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी भारतीय भागीदारांसोबत संयुक्त उपक्रम राबवण्यासाठी आणखी जास्त गुंतवणूक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

स्वदेशीकरणासाठी भारताच्या प्रयत्नांना इस्रायलकडून सातत्याने सहकार्य करण्याची इस्रायली मंत्र्यांनी ग्वाही दिली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची आणि भागीदारी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. दोन्ही देशांदरम्यानच्या राजनैतिक संबंधांना 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त करण्यात आले आणि हे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याबाबत त्यांनी सहमती व्यक्त केली. 

 

 S.Kane/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922920) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil