परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

भारताची जी20 अध्यक्षता : तिसऱ्या विकास कार्यगटाची(DWG) बैठक


गोव्यातील तिसऱ्या विकास कार्यगटाच्या बैठकीच्या(9-11 मे, 2023) निमित्ताने महिला प्रणित विकासावर प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 09 MAY 2023 6:05PM by PIB Mumbai

पणजी, 9 मे 2023

गोव्यात 9 ते 11 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विकास कार्यगटाच्या(DWG) बैठकीच्या सोबतच भारताच्या महिला प्रणीत उपक्रमाचे दर्शन घडवणारे एको- सुरक्षित हवामान आणि आरोग्यकारक अर्थव्यवस्था जास्तीत जास्त संधी निर्माण करते, या विषयावर महिला आणि बालविकास मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने एक प्रदर्शन आयोजित केले  . ‘एको’ ही संकल्पना महिला प्रणीत विकास आणि शाश्वत विकासामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका यांना प्रतिबिंबित करते.

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने या प्रदर्शनाची व्यवस्था केली होती. यामध्ये महिलांच्या नेतृत्वाचे महत्त्व आणि कशा प्रकारे महिला प्रणीत विकास हा लिंग समानता आणि शाश्वत भविष्याचा पाया आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक आर्थिक वृद्धीमध्ये आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे  विशेषतः एसडीजी5 साध्य करण्यामध्ये महिलांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि अपरिहार्य भूमिकेच्या प्रभावाचे प्रतिबिंब या प्रदर्शनातून पाहायला मिळते. 

या प्रदर्शनात हातमाग आणि वस्रोद्योगाशी संबंधित जिन्नस, हस्तकला, मसाले, आयुर्वेदिक उत्पादने आणि भरड धान्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ यांसारखी पूर्णपणे महिलांच्या संकल्पनेतून आणि रचनांद्वारे तयार करण्यात आलेली उत्पादने मांडण्यात आली होती. या प्रदर्शनाच्या इतर काही वैशिष्ट्यांमध्ये खेळणी तयार करणाऱ्या, विणकाम करणाऱ्या, तंत्रज्ञानाची हाताळणी करणाऱ्या महिलांच्या थ्रीडी हॉलोग्रामसह डिजिटल अनुभव, कारागीरांकडून त्यांच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण, पदार्थ चाखण्याची सुविधा असलेला विभाग आणि आयुर्वेदिक डॉक्टरांकडून प्रकृती तपासणी यांचा समावेश होता.

भारतातील विविध राज्यांमधील महिला प्रतिनिधी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, वस्रोद्योग मंत्रालय, अपेडा, चहा मंडळ, मसाले मंडळ, अंबी उद्योगिनी प्रतिष्ठान, उन्नती फाउंडेशन, कल्यशास्त्र, महिला बचत गट आणि सी6, जल सखी आणि डिजिटल सखी यांसारखे महिला प्रणीत स्टार्टअप यामध्ये सहभागी झाले होते.

 

 

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922853) Visitor Counter : 229


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil