सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
"दिव्यांगजन अधिकार कायदा 2016" च्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्त आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या सचिवांची बैठक
Posted On:
09 MAY 2023 5:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने (DEPwD) सचिव राजेश अग्रवाल यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली "दिव्यांगजन अधिकार कायदा 2016" च्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अनेक सुधारणा उपक्रम राबवले आहेत. अशा उपक्रमांच्या शृंखलेत आज राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली निवासी आयुक्त आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली.
बैठकीची सुरुवात दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या सचिवांच्या स्वागतपर भाषणाने झाली ज्यामध्ये त्यांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि इतरांप्रमाणेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम/योजनांवर प्रकाश टाकला. त्याशिवाय, दिव्यांगांसाठी आयसीटी, पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था, पालकांच्या समुपदेशनासह जलद निदान आणि उपचार केंद्रे, उच्च शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, कौशल्य विकास/व्यावसायिक प्रशिक्षण, सर्व भाषांमध्ये शैक्षणिक तसेच जागरूकता निर्माण करणाऱ्या साहित्याची उपलब्धता आणि ब्रेल प्रेस चा प्रचार यासारख्या सुगम्य वातावरणाच्या महत्वावर यावेळी भर देण्यात आला.
दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सहसचिव राजीव शर्मा यांनी डीडीआरएस, एआयसी, सीडीईआयसी शी संबंधित योजनांचा उल्लेख केला आणि या योजना प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय सहभागावर भर दिला.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922823)
Visitor Counter : 181