संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वतीने 17 मे रोजी नवी दिल्ली येथे पेन्शन अदालतचे आयोजन
Posted On:
09 MAY 2023 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाच्या निर्देशानुसार, सर्व मंत्रालये/विभागांद्वारे बुधवार, 17 मे 2023 रोजी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत आयोजित केली जाणार आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसाठी संसदीय कामकाज मंत्रालय देखील उपसचिव (A&P) कार्यालय, संसदीय कार्य मंत्रालय, 92, संसद भवन, नवी दिल्ली येथे, 17 मे रोजी , 2023 रोजी सकाळी 11.00 पासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पेन्शन अदालत आयोजित करणार आहे. निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारी असल्यास त्यांचे निवारण करण्यासाठी या मंत्रालयाचे निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक पेन्शन अदालतला उपस्थित राहू शकतात.
निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक त्यांच्या पेन्शनशी संबंधित तक्रारी rahul.agrawal[at]gov[dot]in किंवा dhirendra.choubey[at]nic[dot]in या ईमेलवर आधीच पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी निवृत्तीवेतनधारकांनी 011-23034746/23034755 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा वर नमूद केलेल्या ईमेल-आयडीवर संपर्क साधावा.
निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे नाव, पदनाम (ज्यावरून ते निवृत्त झाले), (पेन्शन पेमेंट ऑर्डर) पीपीओ क्रमांक, बँकेचा तपशील, सेवानिवृत्तीची तारीख आणि त्यांचा पत्ता दूरध्वनी क्रमांकासह नमूद करावा.अर्जासोबत (पीपीओ) आणि पीपीओ शुद्धिपत्राच्या प्रती (उपलब्ध असल्यास) / बँकेच्या अद्ययावत पासबुकची शेवटची दोन पाने जोडावीत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची लिंक योग्य वेळी प्रकाशित केली जाईल.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922817)
Visitor Counter : 144