संरक्षण मंत्रालय
मालदीवच्या समुद्रातून सुटका केलेल्या दहा मच्छिमारांना भारतीय तटरक्षक दलाने मायदेशी आणले
Posted On:
06 MAY 2023 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2023
मालदीवच्या समुद्रातून सुटका केलेल्या दहा भारतीय मच्छिमारांना भारतीय तटरक्षक दलाने 06 मे 2023 रोजी विशाखापट्टणम येथे सुरक्षितपणे परत आणले आहे.
हे मच्छिमार 16 एप्रिल 2023 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी जवळच्या थेंगापट्टणम येथून समुद्रात गेले होते. मात्र त्यांच्या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि पुढच्या पाच दिवसात ते मालदीवच्या सागरी क्षेत्रात वाहून गेले. 26 एप्रिल 2023 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राच्या – एमआरसीसी च्या समन्वयाने एमव्ही फ्युरियस या जहाजाने मालदीवच्या शोध आणि बचाव क्षेत्रातून या मच्छिमारांची सुटका केली. भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राला मिळालेल्या माहितीच्या आधारे, अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये कॅम्पबेल खाडीतून प्रवास करणाऱ्या आयसीजीएस विग्रह या व्यापारी जहाजाला, या सुटका केलेल्या मच्छिमारांना तिथून बाहेर काढण्यासाठी पाठवण्यात आले होते.
या दहा मच्छिमारांपैकी आठ जण केरळमधील विझिंजमचे आहेत तर दोन जण तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील आहेत. सुटका करण्यात आलेल्या सर्व दहा मच्छिमारांची तटरक्षक दलाच्या जहाजावर प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत हे सर्वजण निरोगी असल्याचे आढळून आले.
M.Pange/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922320)
Visitor Counter : 166