पोलाद मंत्रालय
नवीन आर्थिक वर्षात राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडची दिमाखदार सुरुवात, एप्रिल 2023 मध्ये उत्पादनाच्या आघाडीवर नोंदवली प्रभावी कामगिरी
Posted On:
06 MAY 2023 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2023
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड - आरआयएनएल ने आपल्या स्थापनेपासूनच्या सर्व एप्रिल महिन्यांच्या तुलनेत, या वर्षीच्या एप्रिल महिन्यात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. आरआयएनएल ने या वर्षी एप्रिल महिन्यात 4,19,000 टन हॉट मेटल, अर्थात तप्त धातूचे उत्पादन केले असून यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील उत्पादनाच्या तुलनेत 20% वाढ नोंदवली गेली. स्थापनेपासूनच्या आतापर्यंतच्या एप्रिल महिन्यांच्या तुलनेत या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील प्रत्येक एककाची कामगिरी पुढील प्रमाणे आहे: 2 ब्लास्ट फर्नेस ऑपरेशन, ब्लास्ट फर्नेस-1 मधून 2,02,000 टन हॉट मेटल (गोदावरी - एप्रिल, 2022 च्या तुलनेत 14% वाढ), ब्लास्ट फर्नेस - 2 मधून 2,18,000 टन हॉट मेटल (कृष्णा - एप्रिल, 2022 च्या तुलनेत 26% वाढ), स्ट्रक्चरल मिलमधून 61,000 टन उत्पादन (एप्रिल, 2022 च्या तुलनेत 100% पेक्षा जास्त वाढ), विस्तारित एककांमधून 1,43,000 टन तयार पोलाद (वायर रॉड मिल-2, स्पेशल बार मिल आणि स्ट्रक्चरल मिल), 80,000 टन उच्च मूल्यवर्धित पोलाद (एप्रिल, 2022 च्या तुलनेत 100% पेक्षा जास्त वाढ).
तांत्रिक मापदंडांच्या आघाडीवर देखील एप्रिल, 2023 मध्ये BF शॉपद्वारे 2.09 टन (हॉट मेटल) उत्पादन प्रतिदिन (दोन्ही ब्लास्ट फर्नेस 1 आणि 2 एकत्र) द्वारा प्राप्त झाले. ब्लास्ट फर्नेस -1 ची उत्पादकता प्रतिदिन 2.01 टन (हॉट मेटल), आणि ब्लास्ट फर्नेस -2 च्या स्फोट भट्टीची उत्पादकता 2.17 टन (हॉट मेटल) इतकी होती. आपल्या स्थापना वर्षापासून आरआयएनएलची कोणत्याही एप्रिल महिन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीत आणि त्यापूर्वीच्या वर्षांमध्ये अनुक्रमे 20%, 14% आणि 26% इतकी वाढ नोंदवली गेली.
M.Pange/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922315)
Visitor Counter : 160