नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी व्ही.ओ.चिदंबरनार बंदरावरून तुतीकोरीन आणि मालदीव दरम्यानच्या थेट मालवाहतूक सेवेचा केला शुभारंभ

Posted On: 05 MAY 2023 6:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी आज व्ही.ओ. चिदंबरनार बंदर इथे आयोजित कार्यक्रमात, ‘एम.व्ही. एमएसएस गॅलेना' या मालवाहतूक जहाजाला हिरवा झेंडा दाखवून, तुतीकोरीन आणि मालदीव दरम्यानच्या थेट जलमार्ग सेवेचा शुभारंभ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, जून 2019 मधील मालदीव भेटीदरम्यान, भारताचे पंतप्रधान आणि मालदीवचे राष्ट्रपती यांनी, सक्षम पायाभूत सुविधांच्या स्थापनेद्वारे भारत आणि मालदीव दरम्यानचा संपर्क सुधारण्याच्या गरजेवर भर दिला होता, ज्यामुळे दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला देखील चालना मिळेल.

हा विचार पुढे नेत, दोन्ही देशांदरम्यान जल मार्गाने प्रवासी आणि मालवाहतूक सुरु करून परस्पर सामंजस्य वृद्धिंगत करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्या दरम्यान, 08.06.2019 रोजी, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि परिवहन आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय, मालदीव सरकार यांच्यात, सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. शेजारी सर्वप्रथम धोरणआणि संपूर्ण परिसरासाठी सुरक्षा आणि विकासया दृष्टीकोनाला हे सुसंगत आहे. 

 

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तैनात केलेले, 421 TEUs इतक्या मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीसाठी सक्षम असलेले एम.व्ही. एमएसएस गॅलेना हे जहाज 04.05.2023 रोजी PSA SICAL कंटेनर टर्मिनल इथे पोहोचले. PSA SICAL कंटेनर टर्मिनल इथे या जहाजावर 270 TEUs वजनाचे कंटेनर लोड करण्यात आले. एम.व्ही. एमएसएस गॅलेना हे जहाज 05.05.2023 रोजी तुतीकोरीनहून माले साठी रवाना होईल. ते माले इथे 07.05.2023 रोजी पोहोचणे नियोजित आहे. तुतीकोरीन- माले- तुतीकोरीन अशी महिन्यातून तीन वेळा ही मालवाहतूक सेवा उपलब्ध असेल.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922191) Visitor Counter : 169


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu