नौवहन मंत्रालय

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणने  केवळ 22 तासांचा (0.9 दिवसांच्या बरोबरीचा) प्रभावी कार्यवाही कालावधी  (टीएटी) नोंदवून भारताला सर्वोच्च कामगिरी करणार्‍या देशांमध्ये मिळवून दिले  स्थान 

Posted On: 04 MAY 2023 4:22PM by PIB Mumbai

 

गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या  विक्रमी हाताळणी कामगिरीनंतर महिन्याभराने जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए),या कंटेनर हाताळणी करणाऱ्या  प्रमुख बंदराने कंटेनर कार्गो हाताळणीत जागतिक मापदंड  स्थापित करत आणखी एक पराक्रम  केला आहे. .जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक अहवाल, 2023 नुसार, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा  प्रभावी कार्यवाही कालावधी  म्हणजेच  जहाजात माल चढवण्याच्या आणि उतरवण्याचा कालावधी  केवळ 22 तास (0.9 दिवसांच्या बरोबरीने) आहे त्यामुळे  भारताला सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये  स्थान देण्यात आले आहे.

माल चढवण्यासाठी आणि  उतरवून घेण्यासाठी कंटेनर थांबण्याचा कालावधी  कमी करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे  जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण ही कामगिरी करू शकले. सर्वात महत्त्वाचे म्हणजेबंदरात कार्यक्षम कामकाजासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जेएनपीएने हाती घेतलेल्या, उत्तम भूपृष्ठ - रेल्वे आणि रस्ते कनेक्टिव्हिटीकेंद्रीकृत  पार्किंग प्लाझा (सीपीपी) सुविधा, प्रक्रियांचे डिजिटलीकरण; जहाज थांबण्याची आणि निघण्याची प्रक्रिया  सुव्यवस्थित करणे; जहाजाच्या सुरळीत संक्रमणासाठी अधिक टग्स तैनात करणे आदी  उपक्रमांबरोबरच टर्मिनल परिचालनाच्या  कार्यक्षमतेचा यात सर्वात मोठा वाटा आहे

जेएनपीएमधील आम्हा सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे.नुकतेच  गेल्या महिन्यात आम्ही 2022-23 मध्ये 6.05 दशलक्ष टीईयु हाताळण्याचा विक्रम साधला आहे, लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक 2023 अहवालानुसार जेएनपीएचे कार्यक्षमतेचे मापदंड अनेक देशांपेक्षा चांगले आहेत आणि आम्ही एक टीम म्हणून, आयात निर्यात  व्यापारासाठी लॉजिस्टिक खर्च आणि वेळ आणखी कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत हे जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे'', असे जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जेएनपीएचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी संपूर्ण टीमचे  अभिनंदन केले आहे.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922007) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu