उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2023 4:52PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, बुद्ध पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी मी लोकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
बुद्ध पौर्णिमा हा दिवस गौतम बुद्ध यांनी दिलेली शिकवण आत्मसात करण्याचा दिवस आहे, त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेला विचारातील उदात्तता आणि कृतीद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित केले. अहिंसा, सहिष्णुता आणि शांतता याबद्दलचा त्यांचा संदेश सर्वदूर पसरला आहे आणि तो संदेश सर्वांना सहानुभूती आणि सलोखा असलेल्या समाजाची उभारणी करण्यासाठी प्रेरित करत राहील.
या शुभप्रसंगी , भगवान बुद्धांच्या धम्मच्या सिद्धांताप्रति आपण स्वतःला पुनसमर्पित करू या आणि करूणा आणि दयाळूपणा हे सद्गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया.
***
S.Kane/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1921967)
आगंतुक पटल : 222