रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 965G च्या बारामती-इंदापूर क्षेत्रातल्या तुकाराम महाराज पालखी मार्गावर यशस्वी वृक्षारोपण केलेल्या 1,025 वटवृक्षांपैकी 85% वृक्ष जीवित आहेत- नितीन गडकरी

Posted On: 02 MAY 2023 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट मालिकेच्या माध्यमातून सांगितलं आहे की महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 965G च्या बारामती इंदापूर क्षेत्रात मोडणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आपण फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पा अंतर्गत आपण 1025 वटवृक्ष या महामार्गाच्या कडेने लावले होते. या रोपण केलेल्या वृक्षांपैकी 870 वृक्ष (85%) सुरक्षित आणि जीवित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रोपण केलेले हे वृक्ष अतिशय जोमाने वाढले असून  दररोज विशाल पर्णसंभाराचं दर्शन घडत असल्याचं  गडकरी यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचं संवर्धनच झालं नाही तर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे वृक्ष नेत्रसुखद अनुभवही देत आहेत.

 

 S.Patil/S.Naik/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1921378) Visitor Counter : 185


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil