दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय ध्वनी/संदेश वहनच्या व्याख्येबाबत सल्लापत्र जारी केले

Posted On: 02 MAY 2023 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज आंतरराष्ट्रीय ध्वनी/संदेश वहनाच्या व्याख्येबाबत एक सल्लापत्र जारी केले आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा, 1997 च्या कलम 11(1)(अ) (सुधारित) अंतर्गत आंतरराष्ट्रीय एसएमएस आणि देशांतर्गत  एसएमएसच्या व्याख्येबाबत  शिफारशी द्याव्यात अशी विनंती दूरसंचार विभागाने दिनांक 30.08.2022 च्या एका संदर्भाद्वारे प्राधिकरणाला केली होती.

दूरसंचार नेटवर्कवर जो भार वाहून नेला जातो त्याला वहन किंवा ‘दूरसंचार वाहतूक’ असे म्हणतात. दूरसंचार वाहतुकीमध्ये अनेक प्रकारच्या वाहतुकीचा समावेश होतो , उदा.  व्हॉइस कॉल, एसएमएस इ. तसेच दूरसंचार वाहतुकीमध्ये देशांतर्गत वाहतूक (म्हणजे देशातील वाहतूक ) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक  यांचा समावेश असतो. भारताच्या संदर्भात, देशांतर्गत वाहतुकीमध्ये इंट्रा-सर्कल आणि इंटर सर्कल वाहतूक यांचा समावेश होतो आणि याची एकीकृत परवान्यामध्ये विशेष व्याख्या करण्यात आली आहे.  इंट्रा-सर्कल वाहतूक आणि इंटर सर्कल वाहतूक  हे देशांतर्गत वाहतुकीचे दोन घटक असल्यामुळे ‘देशांतर्गत वाहतूक’ ही संज्ञा एकीकृत परवानामध्ये  स्पष्टपणे परिभाषित केली आहे.

प्राधिकरणाने नमूद केले आहे की एकीकृत परवान्यामध्ये 'आंतरराष्ट्रीय ध्वनी/संदेश वहन ' या संज्ञेची व्याख्या केलेली नाही आणि 'आंतरराष्ट्रीय एसएमएस' हा 'आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा एक प्रकार आहे. त्यामुळे एकीकृत परवाना करारामध्ये आंतरराष्ट्रीय एसएमएस परिभाषित करण्याऐवजी ‘आंतरराष्ट्रीय वाहतूक’ हा शब्द परिभाषित करणे योग्य ठरेल असे प्राधिकरणाचे मत आहे.

या संदर्भात, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (www.trai.gov.in)  आंतरराष्ट्रीय वाहतुकीबाबत संबंधितांकडून सूचना मागवण्यासाठी  एक सल्लापत्र  जारी केले  आहे. या सल्लापत्रात मांडण्यात आलेल्या  मुद्यांवर 30 मे 2023 पर्यंत संबंधितांकडून लेखी सूचना आणि 13 जून 2023 पर्यंत प्रति-सूचना मागविण्यात आल्या आहेत. सूचना प्रति-सूचना शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advmn@trai.gov.in. वर पाठवता येतील.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1921373) Visitor Counter : 198