आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जयपूर मधील ‘योग महोत्सवात’ 15,000 हून अधिक जणांचा सहभाग

Posted On: 02 MAY 2023 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

जयपूरच्या श्री भवानी निकेतन शिक्षा समितीच्या विस्तीर्ण मैदानावर 15,000 हून अधिक उत्साही मंडळींनी मान्यवरांसह सामायिक योग प्रोटोकॉल (CYP) सादर केल्याने योग महोत्सवात उत्साही वातावरण होते. आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन, 2023 पूर्वीचा 50 वा दिवस साजरा करण्यासाठी योग महोत्सव हा एक सोहोळा होता. सहभागींनी कॉमन योग प्रोटोकॉल (CYP) पूर्ण लयीत आणि सुसंगतरित्या मंत्रमुग्ध करणाऱ्या परिणामांसह सादर केले.

या कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा; केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजस्थानचे राज्यपाल  कलराज मिश्रा म्हणाले, संपूर्ण जग कोविड-19 च्या रूपाने कठीण काळाचा सामना करत आहे. योग आणि आयुर्वेदाने महामारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत केली आहे. योग दिनाच्या 50व्या दिवसाच्या उलटगणतीच्या या महामहोत्सवाचा भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे.

मेळाव्याला संबोधित करताना सर्बानंद सोनोवाल म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न योगाच्या समृद्ध वारशाची उर्मी जागृत ठेवण्याचा आहे. मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग हे अमृत म्हणून कार्य करते हे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतून मार्गदर्शन घेऊन, आम्ही योगासह आमच्या समृद्ध पारंपरिक औषध प्रणालीच्या मदतीने एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने सज्ज आहोत. भारत या वर्षासाठी जी 20 चे अध्यक्षपद भूषवत असल्याने, जगभरातील लोकांचे आरोग्य आणि निरोगीपणा वृद्धिंगत करण्यासाठी आमची योगाची सॉफ्ट पॉवर पुढे नेण्याची विशेष जबाबदारी आमच्यावर आहे.

या वर्षी आर्क्टिक तसेच अंटार्क्टिक प्रदेशात सीवायपी अर्थात सामायिक योग प्रोटोकॉलचे सादरीकरण करण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन करत आहोत. जयपूर येथील योग महोत्सवाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे योग प्रकारांना जागतिक आरोग्यसुविधा चळवळीचे स्वरूप देण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधिक प्रोत्साहन मिळाले आहे, ते म्हणाले.

राजस्थानात 50 दिवसांचा उलटगणती कार्यक्रम आयोजित करण्यामागील प्रयोजन स्पष्ट करताना केंद्रीय आयुष मंत्री म्हणाले, दर वर्षी शेकडो परदेशी पर्यटक राजस्थानला भेट देतात आणि योगप्रकार तसेच योग चिकित्सा शिकून घेण्यासाठी असंख्य योग शिक्षण संस्थांच्या सेवेचा लाभ घेतात. वैद्यकीय मूल्यसंबंधित प्रवास तसेच अध्यात्मिक पर्यटन या क्षेत्रांच्या संदर्भात राजस्थानमधील योग शिक्षण संस्थांमध्ये फार मोठी क्षमता आहे. आम्ही गावांशी संबंधित पर्यटनाला देखील प्रोत्साहन देत आहोत आणि पर्यटनाच्या या प्रकाराला राजस्थानमध्ये योग हा विषय अत्यंत उत्तम प्रकारे पूरक ठरतो आहे. आगामी काळातील सामूहिक सादरीकरण उपक्रम राजस्थानातील जनतेमध्ये योग प्रकारांविषयीची उत्सुकता वाढवण्यास उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो.

प्रत्येक राज्यात आयुष ग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला या विषयाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयुष ग्राम हा दोन-तीन खेड्यांचा समूह असेल आणि सरासरी 3000 जण यात सहभागी होतील. या उपक्रमात निवडक खेड्यांमध्ये नेमलेल्या योग प्रशिक्षकांच्या माध्यमातून सहभागींना विशेष प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्यात येतील जेणेकरून, येत्या 21 जून 2023 रोजी प्रत्येक आयुष ग्राम सीवायपीचे सादरीकरण करण्यासाठी सज्ज असेल.

जयपूर स्थित, योगस्थळी योग संस्था, योग पीस, मदन गुर्जर आणि सहकारी या तीन योगाशी संबंधित गटांनी देखील योग महोत्सवात योगप्रकार सादर केले. विद्यार्थी, केंद्र तसेच राज्य सरकारमधील अधिकारी आणि योग विषयात रुची असणारे इतर नागरिक यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योगासने केली. योगाच्या माध्यमातून वैद्यकीय मूल्यसंबंधित प्रवासाला अधिक चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने राजस्थान राज्य सरकार, स्थानिक अधिकारी आणि विविध संस्था यांचा सक्रीय पाठींबा आणि सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला.नवी दिल्ली येथील मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संचालक ईश्वर व्ही. बसवराद्दी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले.

 

 

 

 

S.Patil/Vasanti/Sanjana/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1921365) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil