नौवहन मंत्रालय
जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी भारतीय सागरी क्षेत्राची झेप
Posted On:
28 APR 2023 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2023
जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक (आय पीआय) अहवाल - 2023 नुसार, माल चढवण्यासाठी आणि उतरवून घेण्यासाठी कंटेनर थांबण्याचा भारताचा सरासरी वेळ 3 दिवसांचा झाला आहे, यासाठीचा वेळ अमेरिकेसाठी 7 दिवस आणि जर्मनीसाठी 10 दिवस तसेच संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांसाठी 4 दिवस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, 2014 पासून देशाने बंदरे आणि नौवहन क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या सुधारणेवर केलेल्या गुंतवणुकीचे उत्तम परिणाम दिसू लागले आहेत.भारतीय सागरी बंदरांवर कंटेनर थांबण्याच्या अत्यंत कमी वेळेमुळे बंदर उत्पादकता वाढली असून डिजिटलीकरणाद्वारे पुरवठा साखळीत सुधारणा होत आहे. शिपिंग क्षेत्रात देशाने केलेल्या सुधारणांचा हा परिणाम आहे.
पीएम गति-शक्ती राष्ट्रीय बृहत योजने अंतर्गत समन्वित नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे किनाऱ्यालगतच्या प्रदेशाशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे आणि सागरी क्षेत्रात सार्वजनिक खाजगी भागीदारीवर भर दिल्याने आंतरराष्ट्रीय शिपमेंट श्रेणीतील जागतिक क्रमवारीत भारताला 22 व्या क्रमांकावर तर देशाच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक क्रमवारीत सर्वसाधारण 38 व्या स्थानावर झेप घेण्यास चालना मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, धोरणात्मक सुधारणा, नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आणि अधिक सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे बंदराची कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. भारतीय बंदरांनी "टर्न अराउंड टाइम" मध्ये म्हणजेच जहाजात माल चढवण्याच्या आणि उतरवण्याच्या कालावधीमध्ये लक्षणीय सुधारणा नोंदवली आहे.
जागतिक बँकेचा लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक (आय - पीआय ) अहवाल-2023 मध्ये प्रकाशित केल्याप्रमाणे , "टर्न अराउंड टाइम" मापदंडांनुसार अन्य जागतिक देशांच्या तुलनेत भारतीय बंदरांचा "टर्न अराउंड टाइम" 0.9 दिवस असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. भारताचा हा कालावधी अमेरिका (1.5 दिवस) ऑस्ट्रेलिया (1.7 दिवस), बेल्जियम (1.3 दिवस), कॅनडा (2.0 दिवस), जर्मनी (1.3 दिवस), संयुक्त अरब अमिरात (1.1 दिवस), सिंगापूर (1.0 दिवस), रशियन महासंघ (1.8 दिवस), मलेशिया (1.0 दिवस), आयर्लंड (1.2 दिवस), इंडोनेशिया (1.1 दिवस), न्यूझीलंड (1.1 दिवस) आणि दक्षिण आफ्रिका (2.8 दिवस) या देशांपेक्षा चांगला आहे.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920657)
Visitor Counter : 153