संरक्षण मंत्रालय
नवी दिल्लीत आयोजित एससीओ देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी संरक्षण मंत्र्यांनी चीनचे स्टेट कौन्सिलर आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्र्यांची घेतली भेट
भारत-चीन संबंधांचा विकास हा सीमेवरील शांतता आणि स्थैर्यावर आधारित - राजनाथ सिंह
प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सर्व समस्या विद्यमान द्विपक्षीय करार आणि वचनबद्धतेनुसार सोडवणे आवश्यक - संरक्षण मंत्री
प्रविष्टि तिथि:
27 APR 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे चीनचे स्टेट कौन्सिलर आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू यांची भेट घेतली. उभय मंत्र्यांनी भारत-चीन सीमा भागातील घडामोडी तसेच द्विपक्षीय संबंधांबाबत मोकळेपणाने चर्चा केली.
भारत आणि चीन यांच्यातील संबंधांचा विकास हा सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर आधारित आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सर्व समस्या विद्यमान द्विपक्षीय करार आणि वचनबद्धतेनुसार सोडवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. विद्यमान करारांच्या उल्लंघनामुळे द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण आधारच नष्ट झाला आहे असे सांगत सीमेवर तणावमुक्त स्थिती राहील यादृष्टीने, सीमेवरील सैन्य मागे ठेवण्याच्या कार्यवाहीतून तणाव निवळण्यास मदत होईल, याचा पुनरुच्चार संरक्षणमंत्र्यांनी केला.
28 एप्रिल 2023 रोजी आयोजित शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ ) देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीनचे संरक्षण मंत्री दिल्लीत आले आहेत.
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920356)
आगंतुक पटल : 282