संरक्षण मंत्रालय
केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022 चा अंतिम निकाल केला जाहीर
Posted On:
24 APR 2023 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. भारतीय लष्करी अकादमी, डेहराडून, भारतीय नौदल अकादमी एझिमला, केरळ तसेच वायुदल अकादमी, हैदराबाद येथे प्रवेशासाठी (11), सप्टेंबर, 2022 रोजी घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार 204 (146 +43 +15) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आयोगाच्या (http://www.upsc.gov.in) संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहेत. विविध अभ्यासक्रमांसाठी तीन याद्यांमध्ये काही समान उमेदवार आहेत. मात्र, संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022 साठी अधिकारी प्रशिक्षण अकादमी (OTA) ने अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर उमेदवारांचे गुण संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
या याद्या तयार करताना वैद्यकीय चाचणीचे निकाल विचारात घेतलेले नाहीत. या उमेदवारांची जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादींची पडताळणी करणे अद्याप सुरु आहे. त्यामुळे यादीत अनुक्रमांक असलेल्या सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरुपात आहे.
सरकारने सूचित केल्याप्रमाणे भारतीय लष्करी अकादमीसाठी 100 जागा असून त्यात एनसीसीसी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या (लष्कर शाखा) 13 आरक्षित जागांचा तसेच भारतीय नौदल अकादमी, एझीमला, केरळ कार्यकारी शाखेसाठी 22 पदे(साधारण सेवा/हायड्रो (ज्यात एनसीसी सी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नौदल शाखा एनसीसी विशेष प्रवेशाच्या माध्यमातून आलेल्यांसाठी 3 जागा) आणि हवाई दल अकादमी, हैदराबादसाठी 32 जागा (एनसीसी सी प्रमाणपत्र धारण करणार्यांसाठी 3 जागा एनसीसी विशेष प्रवेशाच्या माध्यमातून आलेल्यांसाठी )राखीव (वायुदल शाखा) आहेत.
उमेदवारांना त्यांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रतींसह त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार सैन्य मुख्यालय/नौदल मुख्यालय/हवाई मुख्यालय, येथे सादर करण्याची विनंती केली जात आहे. पत्त्यात काही बदल झाल्यास, उमेदवारांनी ताबडतोब संबंधित मुख्यालयास कळवावे.
कोणत्याही अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी कोणात्याही कामाच्या दिवशी आयोगाच्या प्रवेशद्वार 'सी' जवळील सुविधा खिडकीवर वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011- 23385271/011-23381125/011-23098543 वर सकाळी 10:00 ते 17:00 या दरम्यान संपर्क साधावा.
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919315)
Visitor Counter : 182