नौवहन मंत्रालय
चेन्नई आयआयटीएम डिस्कवरी कॅम्पस येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टीसाठी संशोधनात ठरणार उपयुक्त
Posted On:
23 APR 2023 12:31PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल 24 एप्रिल 2023 रोजी तामिळनाडू चेन्नई, येथील आयआयटी एम (IIT M) डिस्कव्हरी कॅम्पस येथे बंदरे, जलमार्ग आणि किनारे (NTCWPC) संशोधनात उपयोगी ठरणाऱ्या या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील.
सागरमाला कार्यक्रमांतर्गत, आयआयटी चेन्नईमध्ये 77 कोटी रुपये खर्चून या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राची (NTCWPC) स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था मंत्रालयाची तांत्रिक शाखा म्हणून काम करते आणि बंदरे आणि जहाज बांधणी क्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध आवश्यक उत्पादने विकसित करते.
बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टी क्षेत्रासाठी सर्व शाखांमध्ये संशोधन आणि सल्लागार स्वरूपाचे 2D आणि 3D अन्वेषण करण्यासाठी संस्थेकडे जागतिक दर्जाची क्षमता आहे. महासागराची संरचना, किनारी आणि नदीचे प्रवाह निश्चित करणे, गाळाची वाहतूक आणि मॉर्फो डायनॅमिक्स, नेव्हिगेशन आणि मॅन्युव्हरिंगचे नियोजन, ड्रेजिंग आणि सिल्टेशनचा अंदाज, बंदर आणि किनारी अभियांत्रिकीमध्ये सल्लामसलत, ज्यामध्ये संरचना आणि ब्रेकवॉटरची रचना, स्वायत्त प्लॅटफॉर्म आणि वाहने, फ्लो अँड हुल इंटरॅक्शन करिता सीडीएफ आणि एक्सपेरिमेंटल मॉडेलिंग, मल्टिपल हल्सचे हायड्रोडायनामिक्स, बंदर सुविधांसह महासागर अक्षय ऊर्जा याचा समावेश होतो, ही अशी काही क्षेत्रे आहेत जिथे देशाच्या फायद्यासाठी आधीच कौशल्य विकसित केले गेले आहे.
ही संस्था संस्था देशाच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांना वरील काही क्षेत्रांमध्ये सक्षमता प्रदान करते.
***
U.Ujagare/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918938)
Visitor Counter : 163