वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योग क्षेत्रात शाश्वततेसाठी समर्पित असे पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय कृती दल लवकरच तयार केले जाईल- पीयूष गोयल

Posted On: 22 APR 2023 10:30PM by PIB Mumbai

 

शाश्वततेसाठीची भारताची वचनबद्धता लक्षात घेऊन, वस्त्रोद्योग क्षेत्रात, पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय कृती दल लवकरच तयार केले जाईल, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. गुजरातच्या राजकोट इथे आज गोयल यांच्या उपस्थितीत, हातमाग आणि हस्तकला विषयाला वाहिलेल्या ई- वाणिज्य संकेतस्थळाचे ई-उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. सौराष्ट्र तामिळ संगममह्या कार्यक्रमाचा भाग म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेलही उपस्थित होते.

सोमनाथ आणि राजकोट इथल्या या दोन दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चिंतन शिबिरात पीयूष गोयल सहभागी झाले होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह या क्षेत्राच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.

वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक गतिमान बनवण्यासाठी फलदायी चर्चा झाली, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) अनुपालन प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर काही उत्पादक आणि निर्यातदारांना दुप्पट मूल्य मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अधिक उत्पादक आणि निर्यातदारांसाठी हे प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.

2030 पर्यंत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 100 अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य आणि 2030 पर्यंत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 250 अब्ज डॉलर्सचे एकूण लक्ष्य असल्याची माहिती गोयल यांनी  दिली.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918853) Visitor Counter : 213