वस्त्रोद्योग मंत्रालय
कापसाच्या मूल्यवर्धित साखळीसाठी राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांची वस्त्रोद्योग सल्लागार गटासोबत सहावी संवादात्मक बैठक
Posted On:
22 APR 2023 7:04PM by PIB Mumbai
केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली, आज म्हणजेच 22 एप्रिल, 2023 रोजी वस्त्रोद्योग सल्लागार मंडळाशी संवादात्मक बैठक झाली., ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ह्या उपक्रमाचा भाग म्हणून गुजरातच्या राजकोट इथे सुरु असलेल्या सौराष्ट्र-तामिळ संगमम अंतर्गत, देशात कापसाची मूल्य साखळी विकसित करण्याच्या उपक्रमांचा त्यांनी या बैठकीत आढावा घेतला.
पीयूष गोयल यांनी, यावेळी कस्तुरी कॉटन इंडिया चा इतिहास आणि इतर बाबींचा शोध घेण्याची क्षमता, त्याचे प्रमाणीकरण आणि ब्रँडिंग करण्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. भारतीय कापसाचे ब्रँडिंग केल्यास त्याचा भारतीय कापसाच्या मूल्यसाखळीला मोठा लाभ मिळेल. आणि त्याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल.
भारतीय कापसाची गुणवत्ता शेतकरी आणि उद्योग या दोघांसाठीही फायदेशीर आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुकाणू समिती आणि सर्वोच्च समितीच्या बैठका झाल्या आहेत आणि प्रकल्पासाठी निधी जाहीर झाला आहे आणि कस्तुरी इंडिया कॉटनची ट्रेसबिलिटी, प्रमाणीकरण आणि ब्रँडिंगचे काम सुरू झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कस्तुरी कापसाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रीमियम कॉटन म्हणून ब्रँड विकसित करण्याचे आवाहन त्यांनी टेक्सप्रोसिल संस्थेला केले.
सेंद्रिय कापसासाठी प्रमाणीकरण प्रणाली मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय कापूस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगांनी सक्रिय सहभाग द्यावा अशी विनंती गोयल यांनी केली.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे प्रतिनिधी, भारतीय कापूस महामंडळ, अपेडा आणि भारतीय मानक ब्यूरो या संस्थांचे तसेच संबंधित मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीतील भागधारक देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918827)
Visitor Counter : 180