पंचायती राज मंत्रालय

राष्ट्रीय पंचायती राज दिन 24 एप्रिल रोजी साजरा होणार

Posted On: 22 APR 2023 5:02PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारचे पंचायती राज मंत्रालय, मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने 24 एप्रिल 2023 रोजी मध्य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आणि केंद्र सरकारचा समावेशी विकासाचा दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी हा एक प्रमुख कार्यक्रम असणार आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथील स्पेशल आर्म्ड फोर्सेस ग्राउंड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान प्रमुख पाहुणे असतील. या महत्त्वाच्या प्रसंगी पंतप्रधान पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले देशभरातील प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना तसेच विशेष ग्रामसभांना मार्गदर्शन  करतील.

यावेळी पंचायत स्तरावर सार्वजनिक खरेदीसाठी उपयोगात येणाऱ्या एकात्मिक ई-ग्रामस्वराज आणि  गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस (GeM) पोर्टलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. पंचायतींना त्यांच्या वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस GeM च्या माध्यमातून ई-ग्रामस्वराज (eGramSwaraj)प्लॅटफॉर्मचा लाभ मिळवून देणे हा ई-ग्रामस्वराज आणि ई मार्केट प्लेसच्या एकात्मिकरणाचा उद्देश आहे.

देशात स्वामित्व योजनेअंतर्गत 1.25 कोटी मालमत्ता कार्ड वितरणाचा महत्वाचा टप्पा गाठल्याचे प्रतीक म्हणून पंतप्रधान निवडक लाभार्थ्यांना स्वामित्व मालमत्ता कार्ड सुपूर्द करतील.

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918792) Visitor Counter : 154


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil , Telugu