गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवामान विषयक कृती मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शहरांना मदत करण्यासाठी बंगळुरु इथे परिषदेचे आयोजन

Posted On: 22 APR 2023 2:53PM by PIB Mumbai

 

भारतात आणि भारताबाहेर हवामान बदलाविरुद्धच्या लढ्याला बळकटी देण्याच्या जी 20 च्या प्राधान्यक्रमांना मूर्त रूप देणे आणि पुढील कृती निश्चित करणे यासाठी शहरांमध्ये हवामान विषयक कृती मुख्य प्रवाहात आणणे, यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदार बंगळुरुमध्ये एकत्र आले होते. सध्याच्या सहा पैकी तीन युवा -20 प्राधान्य क्षेत्रांवर (हवामान अर्थसहाय्याला गती देणे, जल सुरक्षा सुनिश्चित करणे, आणि पर्यावरण पूरक व्यवहार यांना प्रोत्साहन देणे), चर्चा झाली.

वाढत्या तापमान आणि पर्जन्यमानामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शहरांना हवामान बदलाविरुद्ध कृती करण्यासाठी देशातील सरकार आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून वाढीव मदत मिळणे गरजेचे आहे यावर सहभागी सदस्यांचे एकमत झालेअर्थसंकल्प तयार करताना, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीचा वापर करून घेताना, नगरपालिका हरित बॉंड जारी  करताना आणि इतर नावीन्यपूर्ण अर्थसहाय्य योजना अमलात आणताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी वातावरण बदलाचे परिणाम देखील लक्षात घ्यायला हवेत. हवामान कृती योजनेत जल सुरक्षा आणि काटकता, गरज असेल तिथे संकटात असलेल्या जलस्रोतांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी संस्थात्मक आणि नियामक सुधारणा करण्यचा विचार केला पाहिजे, सर्वांना स्वच्छ पाणी मिळेल आणि त्यासोबतच पुराचा धोका राहणार नाही, हेही सुनिश्चित केले पाहिजे.

शाश्वत शहरे तयार करण्यासाठी, अभिनव आणि सर्वसमावेशक आराखडा महत्वाचा आहे. त्याशिवाय कृती आणि धोरणांतला बदल यशस्वी होणार नाही, असे गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी मोहिमेचे संचालक आणि सहसचिव कुणाल कुमार यांनी सांगितले.

भारत आणि जगभरातील शहरे हवामान बदलविषयक कृतीमध्ये महत्वाची भूमिका बजावू लागली आहेत. मात्र त्यांच्यापुढे क्षमतेची कमतरता आहे. कारण त्यांना हवामान बदलाविरुद्ध तातडीने कारवाई करायची गरज आहे. राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर शहरांचे महत्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरणाला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, यासाठी ही बैठक नेत्यांसाठी नवी सुरुवात करणारी ठरणार आहे. असे, दक्षिण आणि पश्चिम आशियाच्या क्षेत्रीय संचालक श्रुती नारायण यावेळी म्हणाल्या.

सी 40 शहराचा हवामान नेतृत्व गट या संस्थेने आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय यांनी बंगळुरु इथे 21 एप्रिल 2023 रोजी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली होती.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1918776)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu