उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र आणि राज्यसरकारमधील प्रशासनात समानता आणून सहकार्यात्मक संघराज्याची व्यवस्था अधिक सुदृढ करण्यात सनदी नोकर महत्वाची भूमिका बजावतात -उपराष्ट्रपती


नागरी सनदी सेवांमध्ये समाजातील सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व वाढत असल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला आनंद

उपराष्ट्रपतींच्या हस्ते 16 व्या सनदी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन

Posted On: 20 APR 2023 5:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

केंद्र आणि राज्ये यांच्यातील प्रशासनात एकवाक्यता आणून सनदी सेवा अधिकाऱ्यांनी संघराज्यात्मक सहकार्याचे तत्व अधिकाधिक जिवंत आणि चैतन्यमय राहील, यासाठी प्रयत्न  करावेत, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते, 16 व्या नागरी सेवा दिनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यंदाच्या नागरी सेवा दिनाची संकल्पना, विकसित भारत: नागरिकांना सक्षम करणे आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अशी आहे, असे अधोरेखित करत उपराष्ट्रपती म्हणाले की या  संकल्पनेत  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे- ज्यात सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव यांचे खरे प्रतिबिंब उमटले आहे.

मिशन कर्मयोगी- या, सप्टेंबर 2020 मध्ये प्रारंभ झालेल्या सनदी सेवा अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीविषयक कार्यक्रमाची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. हे अभियान भविष्यासाठी सज्ज असलेल्या नागरी सेवा अधिकाऱ्यांना घडवण्यात महत्वाची भूमिका बजावते आहे, असे ते म्हणाले. ह्या अभियानाद्वारे सनदी अधिकाऱ्यांना नव्या भारताच्या उभारणीसाठी आवश्यक अशा योग्य दृष्टिकोन, कौशल्ये आणि ज्ञान यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

या अमृत काळात सनदी अधिकारी, 2047 चा विकसित भारत घडवणारे योद्धे आहे, आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवापर्यंत, नवा भारत घडवण्याचा पाया ते रचत आहे, असेही ते म्हणाले.

सनदी सेवांमध्ये समाजाच्या सर्व स्तरातील मुलांचे- विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील, दुर्गम भागातील युवकांचे, तसेच उपेक्षित समुदायातील लोकांचे प्रतिनिधित्व वाढते आहे, याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच प्रशासनात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढते आहे, असे नमूद करत यातून  नोकरशाही अधिक संवेदनशील आणि सर्वसमावेशक होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपतींनी ‘नॅशनल गुड गव्हर्नन्स वेबिनार सीरिज’ या ई-बुकचे अनावरण केले. त्यांनी ‘भारतातील सुशासन पद्धती- पुरस्कारप्राप्त उपक्रम’ या विषयावरील प्रदर्शनाचे उद्घाटनही केले.

 S.Kakade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1918316)