सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखालील सांस्कृतिक कार्य गटाने केले ‘सांस्कृतिक आणि रचनात्मक उद्योग आणि रचनात्मक अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन’ या संकल्पनेवर आधारित तिसऱ्या जागतिक वेबिनारचे आयोजन.

Posted On: 20 APR 2023 10:03AM by PIB Mumbai

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखालील सांस्कृतिक कार्य गटाने युनेस्कोबरोबर ज्ञान भागीदारी तत्वावर ‘सांस्कृतिक आणि रचनात्मक उद्योग आणि रचनात्मक अर्थव्यवस्थेला  प्रोत्साहन’  या  संकल्पनेवर आधारित जागतिक वेबिनार आयोजित केले होते. सांस्कृतिक कार्य गटाने निश्चित केलेल्या प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या चार वेबिनारच्या मालिकेतील हे तिसरे वेबिनार होते. 

या वेबिनारमध्ये सांस्कृतिक आणि रचनात्मक उद्योग आणि रचनात्मक अर्थव्यवस्थेला  प्रोत्साहन देण्यासंदर्भात फलदायी विचारमंथन आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान या विषयांवर चर्चा झाली. जी 20 सदस्य आणि निमंत्रित राष्ट्रे, तसेच 13 अंतरराष्ट्रीय संस्था आणि संबंधित संस्थांसह 28 देशांतील 43 तज्ञांनी यात सहभाग घेतला.

सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आणि सांस्कृतिक कार्य गटाचे अध्यक्ष गोविंद मोहन यांनी आपल्या भाषणाच्या आरंभी सांगितले की "व्यक्तींचे आणि समुदायाचे सक्षमीकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन आणि आंतरसांस्कृतिक संवाद यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करणारे, सांस्कृतिक आणि रचनात्मक क्षेत्र हे समाजातील बदलाचे प्रणेते आहे, त्यामुळेच या क्षेत्राला पाठबळ देणे आणि सर्जनशीलता आणि नवोन्मेष अधिकाधिक वाढीला लागावे यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे आवश्यक आहे."

या वेबिनारमध्ये तीन संवाद सत्रे होती आणि या तीन ही सत्रांमध्ये  टाईम झोन अर्थात  वेळेनुसार तज्ज्ञांनी आपले  विचार मांडले.

या वेबिनारमध्ये जी 20 देशांचे प्रतिनिधी, आमंत्रित राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी  मध्ये रचनात्मक अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान दर्शविणारा डेटा-माहिती सामायिक केली.

सांस्कृतिक आणि रचनात्मक उद्योग आता वेगाने अव्वल प्राधान्य क्षेत्रात गणले जाऊ लागले आहेत, काही ठिकाणी त्यासाठी समर्पित मंत्रालय स्थापन करण्यात आले असून त्यावरून त्याचा प्राधान्यक्रम दिसून येतो, असे कित्येक देशांनी सांगितले.

रचनात्मक क्षेत्राची वर्गवारी करण्यासाठीच्या पद्धतींबाबतच्या काही  शिफारशी यावेळी सुचवण्यात आल्या. 15 जुलै ते 18 जुलै 2023 दरम्यान कर्नाटकातील हम्पी येथे होणाऱ्या  सांस्कृतिक कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत चार जागतिक थीमॅटिक (संकल्पना आधारित ) वेबिनारचा एकत्रित अहवाल तयार केला जाईल आणि जी 20 सदस्य, अतिथी राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामायिक केला जाईल.

 

****

Jaidevi PS/Bhakti /CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1918231) Visitor Counter : 201