सांस्कृतिक मंत्रालय
भारताच्या जी20 अध्यक्षतेखालील सांस्कृतिक कार्य गट (सीडब्ल्यूजी) “संस्कृती रक्षण आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर एक जागतिक वेबिनार आयोजित करणार
Posted On:
19 APR 2023 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
भारताच्या जी20 अध्यक्षतेखालील सांस्कृतिक कार्य गट (सीडब्ल्यूजी) “संस्कृती रक्षण आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर एक जागतिक वेबिनार आयोजित करणार आहे. हा वेबिनार भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या या चार वेबिनारच्या मालिकेत सर्वात शेवटी होईल. सांस्कृतिक कार्य गट, ज्ञान भागीदार (नॉलेज पार्टनर) म्हणून या कार्यक्रमाला यूनेस्को, सुविधा पुरवणार आहे. हा वेबिनार 20 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12:30 ते रात्री 8:30 पर्यंत आयोजित केला जाईल. यात सांस्कृतिक कार्य गटाने ठरविलेल्या आणि जी20 सदस्यांनी मान्य केलेल्या प्राथमिकता क्षेत्रात सर्वसमावेशक संवादाला चालना देणे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनात यावर गहन चर्चा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या घटकांचे डिजटल कौशल्य आणि क्षमता वर्धन करणे तसेच जी20 सदस्य, निमंत्रित देश आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थासोबत सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण करणे हा याचा उद्देश आहे.
संकल्पना आधारित जागतिक वेबिनारमध्ये, नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्यांना स्मृती व्यवस्थांना नव्या संधींची ओळख करून देणे आणि नवनवीन मार्गांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे जाता येईल यावर चर्चा करण्यात येईल. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी आणि ऑगमेंटेड रीएलिटी आणि रोबॉटीक्स यांचा समावेश असेल.
उदाहरणार्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता स्मृती संस्थांना मोठ्या प्रमाणत उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण आणि वर्गवारी करण्यात मदत करू शकते, जेणेकरून त्या माहितीचे व्यवस्थापन आणि डिजिटल आर्काइव्ह पर्यंत पोचण्यात मदत होईल. आभासी आणि ऑगमेंटेड रियालिटी तंत्रज्ञानाच्या मदतीने सांस्कृतिक वारसा सहजतेने समजून घेण्यात मोलाची मदत होइल.
असे असले तरी, डिजिटल तंत्रज्ञानाचे सतत बदलणारे स्वरूप स्मृतिपटलावरच्या विश्लेषणासाठी आव्हाने निर्माण करणारे आहे. विशेषतः डिजिटल संवर्धनाच्या क्षेत्रात आव्हाने निर्माण होऊ शकतील. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांचे डिजिटलीकरण करणे, आणि या प्रक्रियेसाठी एक सक्रिय, संदर्भाभिमुख आणि जागतिक आराखडा आवश्यक आहे.आपल्या संस्कृतीसोबत जोडले जाण्याच्या पद्धती आज बदलल्या आहेत. आजच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची व्यापक क्षमता आहे. आणि स्मृति संस्थांनी डिजिटलीकरण करण्यासाठी सक्रियपणे या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यायला हवा.
आगामी वेबिनारमध्ये तीन विभागात विचार व्यक्त केले जातील. विशेषत: वेबिनारच्या संकल्पनेशी निगडीत महत्त्वाच्या पैलूंचा शोध आणि चर्चा करण्यासाठी हे विभाग तयार केले गेले आहेत. त्यानुसार, "संस्कृतीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर". या संकल्पनेअंतर्गत स्थापित विभागांचे उद्दिष्ट ज्ञानाची आणि चांगल्या पद्धतींची देवाणघेवाण करणे, त्रुटी आणि प्राधान्यक्रम ओळखणे आणि त्यातून निष्पन्न झालेल्या शिफारसी, सांस्कृतिक कार्यगटाकडे सादर करणे हे असेल.
यामध्ये तीन विभागांमध्ये विचार मांडले जातील आणि तज्ञांना संबंधित टाइम झोनवर बोलण्याची संधी दिली जाईल. वेबिनारचे सूत्रसंचालन ICOM, ICOMOS आणि UNITAR च्या प्रतिनिधींद्वारे या विषयावरील तज्ञांकडून केले जाईल. युनेस्को (पॅरिस) च्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918112)
Visitor Counter : 173