संरक्षण मंत्रालय
बँकॉक येथे 20 एप्रिल रोजी 8 वा भारत-थायलंड संरक्षण संवाद आयोजित
प्रविष्टि तिथि:
19 APR 2023 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
थायलंड सरकारच्या निमंत्रणावरून, संरक्षण मंत्रालयाच्या विशेष सचिव निवेदिता शुक्ला वर्मा 20-21 एप्रिल 2023 दरम्यान बँकॉकच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान, 20 एप्रिल 2023 रोजी विशेष सचिव, निवेदिता शुक्ला थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाचे संरक्षण उप-स्थायी सचिव जनरल नुचित श्रीबुनसोंग यांच्यासोबत भारत-थायलंड संरक्षण संवादाच्या 8 व्या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान भूषवतील.
या संवादा दरम्यान, सह-अध्यक्ष दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यासाठी नवीन पुढाकारांचा शोध घेतील. दोन्ही देश सामायिक हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. या दौऱ्याचा एक भाग म्हणून, विशेष सचिव निवेदिता शुक्ला थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाचे संरक्षण स्थायी सचिव जनरल सॅनिचानोग संगकाचंत्र यांचीही भेट घेणार आहेत.
भारत आणि थायलंड यांच्यात सामरिक भागीदारी आहे आणि संरक्षण हा या सहकार्याचा प्रमुख स्तंभ आहे. संरक्षण संवाद बैठक, लष्कर-ते-लष्कर विनिमय , उच्च-स्तरीय भेटी, क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण कार्यक्रम आणि द्विपक्षीय सराव यासह व्यापक संवाद वाढवत उभय देशांमधले द्विपक्षीय संरक्षण संबंध कालानुरूप विस्तारले आहेत.
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918012)
आगंतुक पटल : 256