संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन( अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक) यांनी स्वीकारला भारतीय नौदलाच्या कार्मिक सेवा नियंत्रकपदाचा कार्यभार

Posted On: 18 APR 2023 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023

वाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी 17 एप्रिल 2023 रोजी भारतीय नौदलाच्या कार्मिक सेवा नियंत्रकपदाचा कार्यभार स्वीकारला. एक जुलै 1987 रोजी या ध्वज अधिकाऱ्याची भारतीय नौदलात नियुक्ती झाली होती आणि ते दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धकौशल्यात विशेषज्ञ आहेत. ते खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, जॉईन्ट सर्विसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, श्रीवेनहॅम, युके, कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, कारंजा आणि युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज,न्यूपोर्ट, ऱ्होडे आयलंड, अमेरिका यांचे  माजी विद्यार्थी आहेत.

अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी असलेल्या ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदलातील कारकिर्दीदरम्यान आयएनएस विद्युत आणि आयएनएस विनाश या क्षेपणास्त्रसज्ज युद्धनौकां, मिसाईल कॉर्वेट आयएनएस कुलीश, गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आयएनएस मैसूर आणि आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका यांची प्रमुख धुरा सांभाळण्यासह अनेक महत्त्वाच्या परिचालनात्मक, कर्मचारी आणि प्रशिक्षण नियुक्ती जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ध्वज श्रेणीवर पदोन्नती झाल्यावर त्यांनी सदर्न नेव्हल कमांड, कोच्ची येथे मुख्य प्रशिक्षण अधिकारी म्हणून काम केले आहे. जिथे त्यांनी भारतीय नौदलाच्या सर्व प्रशिक्षणाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नौदलाच्या परदेशातील सर्व स्थानांवरील परिचालनात्मक सुरक्षेची देखरेख करणाऱ्या भारतीय नौदल सुरक्षा पथकाची उभारणी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी सागरी प्रशिक्षण ध्वज अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना पश्चिमेच्या ताफ्याचे प्रमुख ध्वज अधिकारी या अतिशय प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त करण्यात आले. ऑफशोअर  संरक्षण सल्लागार गट आणि सल्लागार किनारपट्टी सुरक्षा आणि संरक्षण या शाखांची देखील त्यांनी धुरा सांभाळली. नंतर त्यांना पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. सध्या त्यांना सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी ते याच पदावर कार्यरत होते.

ऍडमिरल स्वामीनाथन यांनी नवी दिल्लीच्या जवाहर नेहरू विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली आहे. कोच्ची विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून टेलिकम्युनिकेशनमधील एमएस्सी पदवी मिळवली आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेज मधून संरक्षण अभ्यास या विषयातील पदवी, मुंबई विद्यापीठातून डावपेच विषयक अभ्यासात मुंबई विद्यापीठातून एमफिल आणि  आंतरराष्ट्रीय अभ्यासात पीएचडी मिळवली आहे.

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1917671) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu