पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशातील लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 18 APR 2023 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023

उत्तर प्रदेशातील लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री,पीयूष गोयल यांनी आज उत्तर प्रदेशमधील भव्य वस्त्रोद्योग पार्कच्या उद्घाटनाबाबत केलेले ट्विट सामायिक करताना, पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशांमध्ये म्हटले आहे;

उत्तर प्रदेशमध्ये वस्त्रोद्योगाची समृद्ध परंपरा,मोठी बाजारपेठ आणि ग्राहकवर्ग आहे. हे कष्टकरी विणकर आणि कुशल कामगारांचे माहेरघर आहे.लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कच्या उभारणीचा उत्तर प्रदेशला खूप फायदा होईल.

उत्तर प्रदेशातील माझ्या सर्व बंधू-भगिनींसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.लखनौ आणि हरदोई येथे पीएम मित्र पार्कचे लोकार्पण होत आहे.या निमित्ताने तुम्हा सर्वांना  हार्दिक शुभेच्छा.

1000 पेक्षा अधिक एकरांवर व्याप्त  हे पीएम मित्र पार्क स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याबरोबरच रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध करणार आहे.देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रालाही यामुळे नवे बळ मिळणार आहे.

G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1917612) Visitor Counter : 102