पंचायती राज मंत्रालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार 17 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचे उद्घाटन आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे वितरण

Posted On: 16 APR 2023 12:22PM by PIB Mumbai

 

येत्या 24 एप्रिल 2023 च्या राष्ट्रीय पंचायती राज दिनाचे औचित्य साधून पंचायती राज मंत्रालय, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून 17 ते 21 एप्रिल 2023 दरम्यान राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा करणार आहे. पंचायत राज या संकल्पनेमागची मूळ भावना आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाअनुकूल साजरा करण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी, 'संपूर्ण समाज' आणि 'संपूर्ण सरकार' दृष्टिकोन रुजवण्यासह स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला त्याचा स्पर्श व्हावा यासाठी पंचायती राज मंत्रालयाने 'पंचायतों के संकल्पों की सिद्धि का उत्सव' या संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.

या अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींना मानाचे पुरस्कार प्रदान केले जातील. त्याचसोबत त्यांच्या कामगिरीविषयीही चर्चा केली जाईल, जेणेकरून इतर पंचायत प्रतिनिधी आणि संबंधितांसमोर आदर्श उभा राहील.

पाच दिवसांच्या या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाची सुरुवात उद्या नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान सोहळा आणि पंचायतींना प्रोत्साहन या विषयावरील राष्ट्रीय परिषदेने होईल.यावेळी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचे उद्घाटन आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे वितरण होईल. देशभरातील 1,500 हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते उपस्थित राहणार आहेत.

 

क्र .

दिनांक / दिवस

राष्ट्रीय परिषद

स्थळ

1.

17एप्रिल 2023 (सोमवार)

राष्ट्रीय पंचायत प्रोत्साहन परिषद तथा पुरस्कार प्रदान सोहळा

प्लेनरी हॉल ,

विज्ञान भवन ,

नवी दिल्ली

2.

18 एप्रिल 2023 (मंगळवार)

दारिद्र्यमुक्त आणि वर्धित उपजीविका पंचायत, आत्मनिर्भर पायाभूत सुविधा असलेल्या पंचायत आणि सुशासन असलेल्या पंचायत,यावर राष्ट्रीय परिषद

सी. सुब्रमण्यम सभागृह ,

एनएएससी, पुसा, नवी दिल्ली

3.

19एप्रिल 2023 (बुधवार)

बालस्नेही , महिलास्नेही आणि सामाजिक सुरक्षा असलेल्या पंचायतींवर यावर राष्ट्रीय परिषद

सी. सुब्रमण्यम सभागृह ,

एनएएससी, पुसा, नवी दिल्ली

4.

20एप्रिल 2023 (गुरुवार)

जल स्वयंपूर्ण ग्रामपंचायत, स्वच्छ आणि हरित पंचायत यावर राष्ट्रीय परिषद

सी. सुब्रमण्यम सभागृह ,

एनएएससी, पुसा, नवी दिल्ली

5.

21 एप्रिल 2023

(शुक्रवार)

सर्वोत्तम ग्रामपंचायत, शाश्वत विकास प्रयत्न-2047साठीचा मार्ग यावर राष्ट्रीय परिषद

 

सी. सुब्रमण्यम सभागृह ,

एनएएससी, पुसा, नवी दिल्ली

 

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे थेट वेबकास्ट विज्ञान भवन, नवी दिल्ली येथून 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता वेबकास्ट लिंकवर उपलब्ध होईल:https://webcast.gov.in/mopr. संकल्पना आधारित थेट वेबकास्ट 18 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत याच लिंकवर [https://webcast.gov.in/mopr] सकाळी 10 वाजता उपलब्ध असेल.

****

R.Aghor/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1917100) Visitor Counter : 227


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu