अर्थ मंत्रालय

प्रत्यक्ष कर सांख्यिकी आकडेवारी जाहीर

Posted On: 13 APR 2023 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) वेळोवेळी सार्वजनिक डोमेनवर  प्रत्यक्ष कर संकलन आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाची सांख्यिकी आकडेवारी प्रसिद्ध करत असते. कर मंडळाचा सार्वजनिक डोमेनवर अधिकाधिक माहिती प्रसिद्ध करण्‍याचा  प्रयत्न असतो. यानुसार सीबीडीटीने आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत सर्व आकडेवारी अद्यतन केली आहे.

यापैकी काही आकडेवारीमधील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

(1) निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 121.18% वाढले आहे. आर्थिक वर्ष 2013-14 ते 6,38,596 कोटी रूपयांवरून वाढून ते आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये    14,12,422 कोटी रूपये झाले आहे.

(2) निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 160.17% वाढले आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मधील  6,38,596 कोटी रुपयांवरून  ते आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये  ते  16,61,428 कोटी (अंतरिम) रूपये झाले आहे.

(3) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 126.73% पेक्षाही जास्त वाढले आहे.  एकूण प्रत्यक्ष कर संकलनाने यावर्षात  16,36,081 कोटी रुपयांचा टप्पा गाठला. तर आर्थिक वर्ष 2013-14मध्‍ये हे संकलन  7,21,604 कोटी रूपये झाले होते.

(4) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 172.83% पेक्षा जास्त झाले आहे. या कर संकलनाने 19,68,780 कोटी (अंतरिम) आकडा गाठला आहे. तर   आर्थिक वर्ष 2013-14 मध्‍ये हे संकलन  7,21,604 कोटी रूपये झाले होते.

(5) कर दरवाढ न करता कर संकलनामध्‍ये होणारी वाढ आणि जीडीपी यांच्‍यातील संबंधाचा विचार करता  आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2.52  थेट कर संकलन वाढ नोंदवली गेली आहे.  गेल्या 15 वर्षात नोंदवलेली  सर्वाधिक प्रत्यक्ष कर उलाढाल आहे.

(6) प्रत्यक्ष कर आणि जीडीपी यांचे  गुणोत्तर  आर्थिक वर्ष 2013-14 मध्‍ये  5.62% होते. त्यामध्‍ये वाढ होवून  आर्थिक वर्ष 2021-22  मध्‍ये  5.97% झाले आहे.

(7) संकलनाच्या खर्चामध्ये घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्‍ये एकूण संकलनाच्या एकूण संकलनाच्या  0.57% खर्च झाला होता.मात्र आर्थिक वर्ष 2021-22  मध्‍ये   हा खर्च 0.53% झाला आहे.

भारतातील प्रत्यक्ष कर प्रशासनाची  परिणामकारकता आणि कार्यक्षमतेच्या विविध निर्देशांकांचा  दीर्घकालीन कल  कसा आहे, याचा  अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक डोमेनवर सांख्यिकी आकडेवारीची माहिती उपलब्ध करून देण्‍यात आली आहे.  शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, संशोधन क्षेत्रातील विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि सामान्य जनतेसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

ही सर्व माहिती www.incometaxindia.gov.in. वर उपलब्ध आहे.

 

 

 

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1916346) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil