ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

तूर आणि उडीद डाळीच्या घोषित साठ्याच्या सद्यस्थितीचा केंद्र सरकारने घेतला आढावा


आढावा बैठकीत 9 राज्ये सहभागी

साठ्याची पडताळणी करण्याचे आणि घोषित न केलेल्या साठ्यांवर कठोर कारवाई करण्याचे राज्यांना निर्देश

Posted On: 12 APR 2023 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023

नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव  रोहित कुमार सिंह यांनी आज डाळ उत्पादक आणि डाळींचा वापर करणाऱ्या प्रमुख  राज्यांसह तूर आणि उडीद डाळीच्या घोषित साठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

आयातदार, कारखानदार , साठवणूकदार , व्यापारी इत्यादींच्या माध्यमातून साठा घोषित करणे सुनिश्चित करण्यासाठी नोंदणीकृत घटकांची  संख्या आणि घोषित केलेल्या साठ्याच्या  प्रमाणांचा  राज्यांसह वैयक्तिकरित्या आढावा घेण्यात आला  आणि ज्या भागात जोर देणे आवश्यक आहे त्यावर प्रकाश टाकण्यात आला.

साठा घोषित करण्यासंदर्भातील पोर्टलवर नोंदणीकृत घटकांची  संख्या वाढली असताना, काही राज्यांमध्ये भागधारकांची वास्तविक संख्या जास्त असू शकते असे निदर्शनास आले.काही राज्यांमध्ये उत्पादन आणि वापराच्या तुलनेत तूर डाळीचा साठा घोषित करण्याचे  प्रमाणही  कमी असल्याचे आढळून आले आहे.बाजारातील कंपन्यांची  व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकारांना एफएसएसएआय  परवाने, एपीएमसी  नोंदणी, जीएसटी  नोंदणी, गोदामे आणि कस्टम बाँड गोदामांशी संबंधित डेटा पाहण्याची सूचना देण्यात आली होती. 

यासंदर्भात राज्य बारकाईने लक्ष  ठेवून  आहेत अशी माहिती देत साठा घोषित करण्यासंदर्भातील पोर्टलवर साठ्याची अनिवार्य नोंदणी आणि साठा घोषित करणे  सुनिश्चित करण्यासाठी  उचललेली पावले आणि उपाययोजना राज्यांनी यावेळी सांगितल्या.

जीवनावश्यक वस्तू  कायदा, 1955 आणि काळाबाजार प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा कायदा, 1980 च्या संबंधित कलमांनुसार विविध घटकांकडे  असलेल्या साठ्याची पडताळणी करण्याचे आणि अघोषित साठ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष ठिकाणच्या   परिस्थितीचे आकलन करण्यासाठी, विविध बाजार घटक , कारखानदार आणि भांडार परिचालक  यांच्याकडून  प्रत्यक्ष ठिकाणावरून अभिप्राय मिळवण्याच्या अनुषंगानेग्राहक व्यवहार विभागाने 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध राज्यांची राजधानी आणि जिल्ह्यांमध्ये प्रमुख तूर डाळ  उत्पादक आणि व्यापारी केंद्रांवर नियुक्ती केली आहे ,त्यांचा अभिप्राय मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही  ठरवण्यात येईल.

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915994) Visitor Counter : 135