नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मिळाला 'मिनीरत्न श्रेणी -I 'दर्जा


सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला आयसीआरए द्वारे मिळाले AAA चे सर्वोच्च क्रेडिट रेटिंग

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 2030 पर्यंत 500 GW बिगर जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा निर्मिती क्षमतेचे लक्ष्य गाठण्यासाठी वचनबद्ध आहे : एसईसीआय च्या व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा

Posted On: 12 APR 2023 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) ला सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी मिनीरत्न श्रेणी-1 सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइझ (CPSE) चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने याबाबत एक पत्रक जारी केले आहे.

2011 मध्ये स्थापन करण्यात आलेली भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारताच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी विविध नवीकरणीय ऊर्जा योजना / प्रकल्पांची प्राथमिक अंमलबजावणी करणारी संस्था आहे. आजपर्यंत, एसईसीआयने 56 GW पेक्षा जास्त क्षमतेच्या अक्षय ऊर्जा (RE) प्रकल्पाची क्षमता प्रदान केली आहे. एसईसीआय स्वतःच्या गुंतवणुकीद्वारे तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) म्हणून प्रकल्प उभारण्यात देखील सक्रिय आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला आयसीआरए द्वारे AAA चे सर्वोच्च क्रेडिट रेटिंग मिळाले आहे.

एसईसीआय ने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, गती आणि कामकाजातील लवचिकता या गुणांच्या बळावर अल्प कालावधीत ही कामगिरी केली आहे, असे एसईसीआय च्या व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले. "देशातील नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या जलद वाढीमध्ये एसईसीआय ने केंद्रीय भूमिका बजावली आहे आणि देशाच्या हवामान बदल वचनबद्धता, कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या धोरणांमध्ये आणि शाश्वत ऊर्जा संक्रमणामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे." असेही त्यांनी सांगितले.  पंतप्रधानांचे 'पंचामृत' लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि 2030 पर्यंत 500 GW गैर-जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्यासाठी एसईसीआय च्या वचनबद्धतेची त्यांनी पुष्टी केली.

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1915990) Visitor Counter : 230