विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित सागरी संप्रेषण विकसित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय नौदल यांची भागीदारी
Posted On:
12 APR 2023 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
रमण संशोधन संस्था (आरआरआय) आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त प्रयत्नात सुरक्षित सागरी संप्रेषण विकसित करण्यासाठी क्वांटम तंत्रज्ञानाचा लवकरच वापर करण्यात येणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी )अंतर्गत कार्यरत असलेल्या आरआरआय या स्वायत्त संस्थेने, भारतीय नौदलाच्या संशोधन आणि विकास संस्था, इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली अभियांत्रिकी आस्थापनेसह (डब्ल्यूईएसईई)शस्त्रे आणि सामंजस्य करारावर नुकतीच दिल्ली येथे स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार, पाच वर्षांसाठी आहे. आरआरआयचे संचालक प्राध्यापक तरुण सौरदीप आणि भारतीय नौदलाचे मटेरियल प्रमुख व्हाइस ॲडमिरल संदीप नैथानी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार आरआरआय आपल्याकडे असलेल्या क्वांटम तंत्रज्ञानाची माहिती वापरून आणि संगणकीय (क्यूयूआयसी) प्रयोगशाळेत क्वांटमचे वितरण तंत्र विकसित करण्यासाठी संशोधन कार्याचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे मुक्त अवकाशात संप्रेषण सुरक्षित करण्याच्या देशाच्या प्रयत्नांना भारतीय नौदल आणखी जास्त बळ देऊ शकेल.
क्यूयूआयसीच्या समूह प्रमुख, प्राध्यापक उर्बसी सिन्हा यावेळी म्हणाल्या,“स्वदेशी विकसित विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्ञान आपल्या देशाची सेवा करण्यासाठी वापरण्याची ही एक उत्तम संधी आहे.आम्ही या सहकार्याने उत्साहित आहोत आणि विश्वास आहे की, सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन्सच्या क्षेत्रात आमच्या कौशल्यामुळे आम्ही भारतीय नौदलासाठी संभाव्य सागरी वापराच्या घटकांची ओळख करून देण्यासाठी अत्याधुनिक संशोधनाला चालना देऊ शकू.”
सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशनच्या क्षेत्रात ही प्रयोगशाळा संशोधनात देशात आघाडीवर आहे. त्याच्या काही प्रमुख कामगिरींमध्ये “क्यूकेडीसिम ” नावाच्या ‘एंड-टू-एंड सिम्युलेशन’ साधनसंचाचा विकास, संप्रेषण मंचामध्ये सुरक्षितता सुनिश्चित करणे, दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये सुरक्षित संप्रेषण स्थापित करणे आणि अगदी अलीकडे, स्टेशनरी स्रोत आणि मोबाइल रिसीव्हर यांच्यामध्ये समाविष्ट आहे. विशेषत: बँकिंग, संरक्षण आणि सायबर सुरक्षा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सुरक्षित संप्रेषण स्थापित करण्यासाठी, सिंगल आणि ‘एन्टँगल्ड फोटॉन्स’ चा वापर करून विस्तृत ऍप्लिकेशन्सचा प्रस्ताव आणि अंमलबजावणी करणारी क्यूयूआयसी प्रयोगशाळा ही भारतातील पहिली प्रयोगशाळा आहे.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915971)
Visitor Counter : 191