गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छ भारत अभियान-शहरी 2.0 (SBM-U 2.0) च्या द्वै-मासिक वृत्तपत्राचे दूरदृश्य माध्यमातून प्रकाशन


ही महिला विशेष आवृत्ती अमृतसर येथील देवी राणी यांच्या यशोगाथेवर केंद्रित

Posted On: 11 APR 2023 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023

स्वच्छोत्सव अभियानातील ठळक वैशिष्ट्यांसह स्वच्छतेसाठी महिला करत असलेल्या प्रयत्नांवर केंद्रित महिला विशेष आवृत्ती 05 एप्रिल 2023 रोजी दूरदृश्य माध्यमातून प्रकाशित करण्यात आली. स्वच्छ वार्ताच्या ताज्या आवृत्तीत अमृतसरच्या देवी राणी: दृढनिश्चयाचा मार्ग दाखवणाऱ्या आणि पुण्याच्या आरोग्य हितकारक सिंघम: आरोग्य निरीक्षक कविता, जयाबाई: सामाजिक न्याय, महिलांच्या नेतृत्वाला आकार देणाऱ्या सर्वसमावेशक स्वच्छतेचे नियम ठरविणारे महिला नेतृत्व: या अद्ययावत कथांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या अंकात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP) जलद उभारणी आणि कार्यान्वयन, महसूल उभारणारे अनोखे प्रारुप एसटीपी तसेच शून्य सांडपाणी वसाहत यांची प्रकरणे देखील समाविष्ट आहेत. या अंकात कार्यस्थळावरील कामे, सर्वोत्तम पद्धती, क्षमता वाढवण्याचे उपक्रम आणि भागीदारांसोबतचे सहकार्य देखील दाखवले आहे. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात महिला पुढाकार घेत असल्याने, त्यांच्या प्रेरणादायी कथा इतरांना केवळ प्रोत्साहनच देत नाहीत तर शहरी परिसराचे एका उत्तम उद्यामधे परिवर्तित करत आहेत.

स्वच्छ भारत अभियान-शहरीची 8वी राष्ट्रीय सल्लागार आणि पुनरावलोकन समितीची बैठक 6 मार्च 2023 रोजी, सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृती आराखड्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. SBM-U 2.0 अंतर्गत 3000 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत. 8 व्या NARC बैठकीत या संमेलनातील चर्चेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. स्वच्छ वार्ताच्या दुसऱ्या आवृत्तीने SBM-U उपक्रमांवर प्रकाश टाकतानाच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांबाबतच्या मिलियन प्लस सिटी इनिशिएटिव्ह या उपक्रमाचीही माहिती दिली आहे. स्वच्छ भारत अभियान-शहर 2.0 अंतर्गत, गोबरधन आणि सतत (SATAT) योजनांशी जोडलेले बायो-मिथेनेशन प्रकल्प अक्षय ऊर्जा म्हणून बायो-सीएनजी तयार करतील.

या अनुषंगाने, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 1 फेब्रुवारी 2023 रोजी ईआयएल सोबत सामंजस्य करार केला (MoA). यात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये 'कचऱ्यापासून उर्जा' आणि जैव-मिथेनेशन प्रकल्प विकसित केले जातील .

नागरिकांना, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा सहज उपलब्धता व्हाव्यात तसेच सार्वजनिक स्वच्छतेला गती देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 2014 मधे स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली होती. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’च्या आवाहनाला गेल्या आठ वर्षांत कोट्यवधी नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे आणि देशाच्या शहरी परिदृश्याचा कायापालट केला आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालया अंतर्गत, राबवल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियान-शहरी 2.0 ला कचरामुक्त शहरांसाठी जनआंदोलनाचे स्वरुप आले आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी कृती, सर्वोत्तम पद्धती आणि स्वच्छ शहर तयार करण्यासाठी नागरिकांच्या उर्जेला बळ देण्याण्यासाठी, SBM-U 2.0 ने स्वच्छ वार्ता हे प्रमुख वृत्तपत्र प्रकाशित केले आहे. या द्वैमासिक वृत्तपत्रामध्ये सर्व नागरिकांना अभियानाद्वारे राबविल्या जाणार्‍या उपक्रम आणि कार्यक्रमांबद्दल ताजी माहिती दिली जाईल. कचरामुक्त शहरांचा प्रवास दर्शविणे हा यामागचा उद्देश आहे.

अमृत ​​काळ अर्थसंकल्पात शहरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये त्यांचे याबाबतचे विचार सामायिक केले आहेत. या आवृत्तीत शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता तसेच केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधील महत्त्वाच्या घोषणांवरील पंतप्रधानांच्या अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमधील ठळक मुद्यांचा पट मांडला आहे.

या आवृत्तीत राष्ट्रीय युवा परिषद 2023 आणि U20 बैठकींवर लक्ष केंद्रित करून U20 कार्यक्रमांचाही  मागोवा घेतला आहे.

व्होकल फॉर लोकल उपक्रमात शहरे सहभागी झाल्यामुळे वाचकांना स्वच्छ होळीचा आनंद मिळतो. विविध शहरातील नागरिक फुले आणि भाज्यांपासून होळीचे रंग बनवतात आणि बांबूपासून पिचकारी बनवतात त्यामुळे या आवृत्तीत रंगांच्या सणाभोवतीचा उत्साह आणि जल्लोष टिपला आहे.

वाचक,स्वच्छ भारतची इंग्रजी आणि हिंदीतील ताजी आवृत्ती येथे पाहू शकतात:

https://sbmurban.org/storage/app/media/newsletter/english/women-special-edition-english/index.html

https://sbmurban.org/storage/app/media/newsletter/hindi/women-special-edition-hindi/index.html

 

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915552) Visitor Counter : 182