इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली विकसित करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 10 APR 2023 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2023

 

लोकांना कधीही, कोठेही वापरता येणारी स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली विकसित करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी - बॉम्बे) सोबत सामंजस्य करार केला  आहे.  

सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, युआयडीएआय आणि आयआयटी बॉम्बे फिंगरप्रिंटसाठी कॅप्चर प्रणालीसह एकत्रित केलेल्या लाइव्हनेस मॉडेलसह मोबाईल कॅप्चर प्रणाली तयार करण्यासाठी संयुक्त संशोधन करतील.

स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली, एकदा विकसित आणि कार्यान्वित झाल्यानंतर, चेहऱ्यावरून ओळख पटवण्याप्रमाणेच घरातून फिंगरप्रिंट प्रमाणीकरणास अनुमती देईल. नवीन प्रणाली एकाच वेळी अनेक फिंगरप्रिंट्स कॅप्चर करेल आणि प्रमाणीकरण यशस्वी होण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. नवीन प्रणाली एकदा अस्तित्वात आल्यावर आधार परिसंस्थेत उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुविधांमध्ये भर पडेल.

वापरकर्ता म्हणून चांगला अनुभव असलेल्या आणि बहुतांश नागरिकांडे उपलब्ध असणाऱ्या सर्वसामान्य मोबाईल फोन द्वारे अशी प्रणाली सिग्नल/इमेज प्रोसेसिंग आणि मशिन लर्निंग/डीप लर्निंगचा एकत्रितपणे कल्पक वापर करेल. युनिव्हर्सल ऑथेंटिकेटरला प्रत्यक्षात आणण्यासाठी हे एक पाऊल असेल.

नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी फॉर इंटरनल सिक्युरिटी (एनसीईटीआयएस) द्वारे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या सहयोगाने  युआयडीएआय साठी प्रणाली विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकास (R&D) मध्ये संयुक्त सहभाग असेल. एनसीईटीआयएस हा आयआयटी बॉम्बे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक संयुक्त उपक्रम आहे. एनसीईटीआयएस चे उद्दिष्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या विस्तृत क्षेत्रात अंतर्गत सुरक्षा दलांसाठी स्वदेशी तंत्रज्ञान उपाय विकसित करणे हे आहे.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1915403) Visitor Counter : 225