अर्थ मंत्रालय

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी -जागतिक बँकेच्या वार्षिक स्प्रिंग  मिटिंगला  उपस्थित राहण्यासाठी आज अमेरिकेला रवाना होणार


केंद्रीय वित्तमंत्री गुंतवणूकदार तसेच अनेक देशांसोबतच्या  द्विपक्षीय बैठकांबरोबरच जी 20 देशांचे वित्तमंत्री आणि सेंट्रल बँकांचे गव्हर्नर यांच्या बैठकीतही सहभागी होणार

Posted On: 08 APR 2023 7:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वित्त आणि कंपनी  व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन 10 एप्रिल 2023 पासून सुरु होणाऱ्या अधिकृत अमेरिका दौऱ्यासाठी आज रवाना होत आहेत.

भारतीय वित्त मंत्रालयाच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री करतील आणि त्यात वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे  अधिकारी असतील.

केंद्रीय वित्तमंत्र्यांचे प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

1.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी -जागतिक बँकेच्या स्प्रिंग  मिटिंग

2.   भारताच्या G20 अध्यक्षतेखालील दुसरी G20 वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर  बैठक आणि G20-संबंधित इतर कार्यक्रमांचे यजमानपद भूषवणे 

3.   जागतिक बँक विकास समिती आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समितीचे पूर्ण सत्र

4.    जागतिक अर्थतज्ञ आणि विचारवंत  यांच्याशी संवाद

5.  विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर द्विपक्षीय बैठका

6. गोलमेज बैठकांमध्ये जागतिक स्तरावरील उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी संवाद; आणि

7.   भारतीय समुदायाबरोबर संवाद

वित्तमंत्री सीतारामन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे  गव्हर्नर शक्तिकांत दास 12-13 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या दुसऱ्या G20  वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर  बैठकीचे संयुक्त अध्यक्षपद भूषवतील. G20 सदस्य देश , 13 आमंत्रित देश आणि विविध आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांचे सुमारे 350 प्रतिनिधी उपस्थित राहणार असून विविध  जागतिक समस्यांभोवती केंद्रित बहुपक्षीय चर्चांमध्ये सहभागी होतील.

दुसऱ्या  G20  वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर  बैठकीत तीन सत्रे असतील:-

1.  जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्था

2.   शाश्वत वित्त पुरवठा, वित्तीय क्षेत्र आणि आर्थिक समावेशकता ; आणि

3.  आंतरराष्ट्रीय कर रचना

या वार्षिक स्प्रिंग मिटिंगच्या  निमित्ताने वित्तमंत्री भारताच्या G20 अध्यक्षतेखालील परस्पर हिताच्या  आणि सहकार्याच्या मुद्द्यांवर आणि क्षेत्रांवर चर्चा करण्यासाठी G20 देशांच्या वित्तमंत्र्यांशी  आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांसह इतर प्रतिनिधीमंडळांच्या प्रमुखांबरोबर द्विपक्षीय बैठका  घेतील.

11 एप्रिल 2023 रोजी एका उच्चस्तरीय बैठकीत, वित्तमंत्री, अमेरिकेच्या वित्त मंत्री  जेनेट येलेन यांची भेट घेतील आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914980) Visitor Counter : 187


Read this release in: English , Urdu , Hindi