गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज उत्तर प्रदेशात कौशांबी येथे केले कौशांबी महोत्सव 2023 चे उद्घाटन, 613 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची देखील केली पायाभरणी आणि उद्घाटन
‘ऊर्जावान आणि निरोगी शरीर आणि खंबीर मन’ घडवणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’चा मूलमंत्र आहे
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांनी कामकाजाचा वेळ वाया घालवला, देशातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी केली, आता भगवान श्रीराम लवकरच आपल्या मंदिरात विराजमान होतील
Posted On:
07 APR 2023 7:02PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज उत्तर प्रदेशात कौशांबी येथे कौशांबी महोत्सव 2023 चे उद्घाटन केले आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की आज कौशांबी येथे 613 कोटी रुपयाहून जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील प्रत्येक खासदाराला क्रीडा महोत्सव आयोजित करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या याच भावनेला पुढे घेऊन जात खासदारांनी अतिशय समर्पित भावनेने आणि मेहनतीने कौशांबी महोत्सवात युवा वर्गाला एक मंच उपलब्ध करून दिला आहे. संसद खेलकूद स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 16,000 युवकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी 3324 खेळाडूंना संधी मिळाली आहे. ऊर्जावान आणि निरोगी शरीर आणि खंबीर मन’ घडवणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’चा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शहा म्हणाले की देश सुरक्षित आणि समृद्ध करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताविषयीचा आदर वाढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यघटनेतील 370 वे कलम रद्दबातल केले. रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येमध्ये राम लल्ला मंदिर उभारण्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली आणि आता लवकरच आपल्या मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान असतील. अमित शहा पुढे म्हणाले की देशात ‘लोकशाही’ आणि ‘आयडिया ऑफ इंडिया ’ धोक्यात नाही तर ‘घराणेशाहीची’ संकल्पना धोक्यात आहे कारण लोकांनी घराणेशाहीच्या आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला नाकारले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात विरोधकांनी कामकाजाचा महत्त्वाचा वेळ वाया घालवला आणि त्याबद्दल देशातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लोकशाहीची जातीयवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या विळख्यातून मुक्तता केली आणि गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना तयार केल्या, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश विकासाच्या मार्गावर आगेकूच करत आहे.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914722)
Visitor Counter : 191