उपराष्ट्रपती कार्यालय

बेटी बचाओ बेटी पढाओ आणि नवीन शैक्षणिक धोरणात स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ध्येयदृष्टीचे प्रतिबिंब - उपराष्ट्रपती

Posted On: 07 APR 2023 3:26PM by PIB Mumbai

 

स्वामी दयानंद सरस्वती यांची सामाजिक अनिष्टतेशी लढण्याची दृष्टी आणि कृती आजही सुसंगत असून बेटी बचाओ बेटी पढाओ आणि नवीन शैक्षणिक धोरण यांसारख्या सरकारी उपक्रमांमध्ये त्याचे प्रतिबिंब  प्रतिध्वनी आढळते. नवी दिल्ली येथे आज स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन करताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हे अधोरेखित केले. अस्पृश्यतेसारख्या वाईट सामाजिक रुढीचें निर्मूलन आणि शिक्षणाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी स्वामी दयानंद यांनी केलेल्या समर्पित प्रयत्नांचा उपराष्ट्रपतींनी उल्लेख केला. यामुळे  स्वतंत्र भारतात सामाजिक कल्याणाचा पाया रचला गेला असे ते म्हणाले.

आधुनिक भारताचे विचारवंत-तत्त्वज्ञ आणि आर्य समाजाचे संस्थापक म्हणून स्वामी दयानंद यांच्या योगदानाचा त्यांनी गौरव केला.  भारताने आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंध गमावला होता त्या ब्रिटीश राजवटीच्या काळात स्वामी दयानंद सरस्वती यांनी भारताच्या संस्कृती आचारसंहितेला पुनरुज्जीवित करण्यासाठी तर्कसंगत दृष्टीकोनासह वैदिक तत्वांचे पुनरुत्थान केले, असे ते म्हणाले.

स्वराज्याची घोषणा देणारे स्वामी दयानंद सरस्वती पहिले होते. लोकमान्य टिळकांनी हा वसा पुढे नेला आणि पुढे जाऊन ते जनआंदोलन झाले याची आठवण धनखड यांनी करुन दिली. स्वामीजींसाठी स्वातंत्र्य हे मनाच्या आणि आत्म्याच्या खऱ्या स्वातंत्र्यापासून अलिप्त नव्हते, असे धनखड यांनी अधोरेखित केले.

काही लोक परदेशात जाऊन तेथून आपल्याच देशाची प्रतिमा मलीन  करण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहणे वेदनादायी आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले.

सत्य फाउंडेशनने दूरसंवाद, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने टपाल तिकीट प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914676) Visitor Counter : 144