अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

अवकाश क्षेत्रात सध्या केवळ सरकारी मार्गानेच उपग्रहांची उभारणी तसेच परिचालन यांतील 100% थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

प्रविष्टि तिथि: 06 APR 2023 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 एप्रिल 2023

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुउर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे की अवकाश क्षेत्रात सध्या केवळ सरकारी मार्गानेच उपग्रहांची उभारणी तसेच परिचालन यांतील 100% थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.

राज्यसभेत दिलेल्या निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, देशातील सर्व अवकाशविषयक उपक्रमांसाठी नियामकीय आणि प्रोत्साहनपर संस्था म्हणून भारतीय राष्ट्रीय अवकाश प्रोत्साहन आणि अधिकृतता केंद्र (इन-स्पेस) ही संस्था कार्यरत असून थेट परदेशी गुंतवणूक धोरणातील सुधारणेचे जे काम सरकारच्या विचाराधीन आहे त्यामध्ये या संस्थेचा सहभाग आहे.

सरकारने सुधारित थेट परदेशी गुंतवणूक धोरणाला मान्यता दिल्यानंतर या धोरणाच्या सुविहित अंमलबजावणीतील इन-स्पेस या संस्थेची विशिष्ट भूमिका आपल्यासमोर येईल.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1914427) आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Tamil , Telugu